चिमुकल्याची कोरोनावर मात, रेमडेसिव्हिर मिळवून देणाऱ्या सत्तारांचे पित्याने मानले आभार

दहा दिवस कोरोनाशी लढा दिल्यानंतरसुखरूप बरा होऊन नक्ष आज आपल्या घरी परतला.
Minister Abdul Sattar Help to Corona Affected Child News Aurangabad
Minister Abdul Sattar Help to Corona Affected Child News Aurangabad

सिल्लोड ः कोराना सारख्या संकटात एक छोटी मदत देखील लाखमोलाची ठरते. सिल्लाेडचे आमदार तथा महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली अशीच एक मदत कोरोना झालेल्या पाच वर्षाच्या नक्षसाठी मोलाची ठरली आहे. रेमडेसिव्हिरचा प्रचंड तुटवडा असतांना तातडीची गरज लक्षात घेऊन सत्तार यांनी ते मिळवून दिले. आज या चिमुकल्याने कोरोनावर यशस्वी मात केली. सत्तार यांच्या या मदतीबद्दल डाॅ. असलेल्या पित्याने सत्तार यांचे आभार मानले आहेत.

पाच वर्षाचा नक्ष शेखर दौड खेळत-बागडत असतांना अचनाक त्याला कोरानाने गाठले. बरं लक्षण म्हणावी तर काहीच नाही, पण वडीलच डाॅक्टर असल्यामुळे त्यांनी मुलाची आॅक्सिजन पातळी आणि ह्दयाचे ठोके यावर सातत्याने लक्ष ठेवले.  त्यातील तफावत पाहून डाॅक्टर असलेल्या पित्याच्या ह्दयाचा ठोका देखील चुकला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सिल्लोडमधून मुलाला औरंगाबादच्या निमाई हाॅस्पीटलला हलवले.

तिथे सगळ्या तापसण्या झाल्या पाच वर्षाच्या नक्षला कोरोनामुळे ह्दयाला सूज येऊन आजूबाजूला पाणी झाल्याचे निदान झाले. तातडीने उपचारा सुरू झाले पण रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा होता. कसेबसे तीन इंजेक्शन मिळाले, पण सहा इंजेक्शनचा कोर्स पुर्ण केल्यावरच धोका टळणार होता.

सत्तारांची मदत अ्न कोरोनावर मात..

तेव्हा डाॅ. शेखर दौड यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहाय्यका मार्फत संपर्क साधला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले. सत्तार यांनी तातडीने औरंगाबाद येथे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सिल्लोड नगर परिषदेचे उपाध्यक्ष व चिरंजीव समीर सत्तार यांना औरंगाबादला पाठवले आणि दौड यांच्या नक्षसाठी रेमडेसिव्हिरचे तीन इंजेक्शन उपलब्ध करून दिले.

इंजेक्शन मिळाल्यानंतर नक्ष वरील उपचार पुर्ण झाले. दहा दिवस कोरोनाशी लढा दिल्यानंतर सुखरूप बरा होऊन नक्ष आज आपल्या घरी परतला. नक्षच्या वडिलांनी याबद्दल त्याच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टर आणि रेमडेसिव्हिर मिळवून दिल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत.

सिल्लोड येथील मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. शेखर दौड यांच्या पत्नी डॉ. वैशाली दौड व मुलगा नक्ष हे दोघे १८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ते घरीच डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत होते. परंतु दिनांक २३ एप्रिल रोजी नक्षच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित झाल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली होती.

औरंगाबाद येथील निमाई हॉस्पिटलमध्ये डॉ. संतोष मुद्रेवार यांनी नक्ष याला कोरोनामुळे हृदयाला गंभीर सूज येऊन हृदयाभोवती पाणी(covid myocarditis) झाल्याचे  निदान केले व प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले. बाल हृदगरोग चिकित्सक डॉ. दीपक मारकवार यांनी नक्षवर उपचार करत त्याला कोरोनामुक्त केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com