एमपीएससीबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय मराठा उमेदवारांचे आयुष्य उध्वस्त करणारा

काही लोकांच्या दबावाला बळी पडून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला.
Marahta Reservation- Mla Vinayak  Mete- Cm Udhav Thackeray News
Marahta Reservation- Mla Vinayak Mete- Cm Udhav Thackeray News

बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १४ मार्चला होणारी पुर्व परीक्षा रद्द केल्यानंतर काही लोकांच्या दबावाला बळी पडून २१ मार्चला परिक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या उमेदवारांचा विचार न करता त्यांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला.

मराठा समाजाची किंवा आमची एमपीएससीच्या परिक्षा किंवा शासकीय नोकर भरती होवू नये अशी भूमिका मुळीच नाही. सर्व समाजाच्या मुलांना न्याय मिळावा अशीच भूमिका आमची आहे. परंतू सर्वांना न्याय देत असतांना मराठा समाजाच्या मुला - मुलींना मात्र या स्पर्धा परिक्षा व शासकीय नोकर भरतीपासून वंचित ठेवण्याचे काम करु नये आणि त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यामुळेच सदरील परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी देखील मेटे यांनी केली आहे.

दबावाला बळी पडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय निषेधहार्य असून सर्वोच्च न्यायालयात  १५ मार्च पासून मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सुरू होत आहे. २५ मार्च पर्यंत सुणावणी पूर्ण होणार आहे. त्यांनतर काही दिवसांत निकाल लागण्याची शक्यता आहे. असे असताना सरकारने नोकर भरती आणि स्पर्धा परिक्षा पाच एप्रील नंतर घ्याव्यात ही समाजाची अपेक्षा आम्ही मांडत आहोत. 

या राज्यातील काही मंत्री, प्रशासकीय अधिकारी व नेते यांनी मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचून मराठा समाजाच्या मुला-मुलींना स्पर्धा परिक्षेत स्थान मिळू नये, असे प्रयत्न सुरू केल्याचा आरोपही मेटे यांनी केला. त्याचाच भाग म्हणून काल स्पर्धा परिक्षेच्या विरोधामध्ये आंदोलन उभे केले. त्या दडपणाखाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्णय घेतला.

दिवंगत प्रबोधनकार ठाकरे यांचा व देशाचे कनखर नेतृत्च दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवणारे आजचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे मात्र भूमिकेवर ठाम न राहता बिन कन्याचे व लवचिक निघाले असा टोलाही मेटे यांनी लगावला. एमपीएससीची पूर्व परीक्षा पाच एप्रिल नंतर घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com