ठाकरे `सिल्व्हर ओक` कडे निघाले होते, पण पवारच म्हणाले मी `मातोश्री`वर येतो..

राज्य सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत, पण आम्ही देखील मातीतले पहेलवान आहोत, मॅटवरचे नाही असा टोला लगावतांनाच विरोधक प्रयत्न करतात, पण त्यांना यश येत नाही. तरीही त्यांनी प्रयत्न केले पाहिजे, ते खरे विरोधकांच्या जिंवतपणाचे लक्षण असल्याचा चिमटा देखील राऊत यांनी काढला.
sanjay raut news about pawar-thackery meeting
sanjay raut news about pawar-thackery meeting

औरंगाबादः शरद पवार मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले यात गैर काय? अनेक राजकीय नेत्यांच्या बैठका होत असतात. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या अशा भेठीगाठी होणे हे नित्याचेच. राज्यातील काही महत्वाच्या विषयावर मी, शरद पवार चर्चा करत असतांना काही निर्णय तातडीने घ्यावे लागतील असे आमचे मत बनले. सिल्व्हर ओक येथूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना फोन केला, तेव्हा मी लगेच येतो, असे ते म्हणाले. त्यावर शरद पवारांनी आम्हीच मातोश्रीवर येतो असे सांगतिले, एवढाच काय तो विषय अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पवार- ठाकरे मातोश्री भेटीच्या विषयावर पडदा टाकला.

राज्यातील राजकीय परिस्थिती, कोरोनाचे संकट, विरोधकांकडून केली जाणारी टिका या सगळ्या प्रश्नांना संजय राऊत यांनी ‘साम'चे संपादक निलेश खरे यांना दिलेल्या मुलाखतीत दिलखुलास उत्तरे दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले आणि राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली.

या भेटी संदर्भात सांगताना संजय राऊत म्हणाले, या भेटीत गैर काय आहे? एखादी महत्वाची बैठक घ्यायची असले तर मातोश्रीची जागा कमी पडते. पाच- सहा अधिकाऱ्यांची मिटिंग तिथे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा महापौरांचे निवासस्थान किंवा सह्याद्रीवर अशा बैठका घेतल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत त्यांच्या सिल्व्हर ओक येथे काही महत्वाच्या विषयावर मी आणि आणखी काही नेत्यांची बैठक झाली. काही विषयांवर तातडीने निर्णय घ्यावे लागतील असे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्यांनी लेगच मी तिकडे येतो असे सांगितले, तेव्हा शरद पवारांनी आम्ही मातोश्रीवर येतो असा निरोप दिला आणि पुढची बैठक मातोश्रीवर झाली.

राज्य सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत, पण आम्ही देखील मातीतले पहेलवान आहोत, मॅटवरचे नाही असा टोला लगावतांनाच विरोधक प्रयत्न करतात, पण त्यांना यश येत नाही. तरीही त्यांनी प्रयत्न केले पाहिजे, ते खरे विरोधकांच्या जिंवतपणाचे लक्षण असल्याचा चिमटा देखील राऊत यांनी काढला. कोरोनाची परिस्थिती राज्य सरकारला हाताळता आली नाही हा आरोप देखील चुकीचा आहे. त्यावरून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी, नारायण राणे यांना आज बाळासाहेब असते तर स्पेंट फोर्स नेते असे म्हटले असते. देशातील १७ राज्यांमध्ये कोरोनाचे संकट आहे, मग राष्ट्रपती राजवटीची मागणी करतांना फक्त महाराष्टाचाच विचार होणार का?

राज्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक असले तरी त्या मागे औद्योगीकरण, मजुरांचे मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर ही कारणे आहेत. महाराष्ट्र हे एक मोठे राज्य आहे, मुंबई इतर राज्यात नाही याचा देखील विचार झाला पाहिजे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करणाऱ्यांनी गुजरातमध्ये कोरोना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा कार्यक्रम घेतल्यामुळे वाढल्याच्या तज्ञांच्या मताकडेही लक्ष दिले पाहिजे. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्यावेळी अमेरिकेचे एक शिष्टमंडळ मुंबईत देखील आले होते. त्यामुळे आता कोरोना का वाढला याच्या चौकशीसाठी एक समितीच नेमावी लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मोदींच सरकार जादुगाराच..

देश कोरोनाशी लढा देत असतानाच चीनने पुन्हा डोके वर काढले आहे, केंद्राच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा हा परिणाम आहे का? या प्रश्नावर हा विषय केंद्राशी संबंधित आहे, शिवसेनेचा याच्याशी संबंध नाही असे सांगत केंद्रातील मोदी सरकार हे जादूगाराचं सरकार आहे, त्यांनी पाकिस्‍तानात सर्जिकल स्ट्राईक केला, ते काहीही करू शकतात, चीनला देखील मोदी धडा शिकवतील, असा उपरोधिक टिका देखील संजय राऊत यांनी केली. नेपाळ ज्याचा आपण जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून उल्लेख करायचो ते देखील आपल्यावर उलटले आहे. ते आता चीन, पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले आहे. त्यामुळे आपले नक्कीच कुठे तरी चुकले आहे. 

इंदिरा गांधीच्या काळात इराक, रशिया, श्रीलंका अशी अनेक राष्ट्र भारताच्या बाजुने होती. आज परिस्थिती बदलली आहे, उद्या अमेरिका देखील आपल्या बाजूने उभा राहिल की नाही हे सांगता येणार नाही? असा इशारा देतांनाच नेहरुंच्या पंचशीलाची भूमिका आपल्याला स्वीकारावी लागेल असेही राऊत यांनी सांगितले. परराष्ट्रीय धोरण राबवतांना नेहरूंनी कायम तटस्थ भूमिका घेतली, त्यामुळेच देश पुढे गेला, देश एककल्ली पध्दतीने चालवता येणार नाही, असा टोलाही राऊत यांनी मोदींना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com