आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी; मुख्यमंत्र्यांची भाजपला टाळी?

इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता.
cm udhav thackeray news aurangabad
cm udhav thackeray news aurangabad

औरंगाबाद ः मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्धाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा साद घातल्याचे दिसून आले. (Chief Minister Uddhav Thackeray again called on the BJP) भाषणात सुरूवातीलाच `व्यासपीठावार उपस्थित असलेले आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी`, असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टाळी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी हे विधान केल्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली होती. (Chief Minister Uddhav Thackeray, Maharashtra)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्तचा ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थिती होती. (Bjp Leader Raoshaeb Danve) यावेली उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी देखील केली. मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपला पुन्हा एकदा एकत्रित येण्याचे आवाहन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, `मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकार`, असा उल्लेख रावसाहेब दानवे यांच्याकडे कटाक्ष टाकत केला. तुम्ही रेल्वे राज्यमंत्री आहात, रेल्वेचा मार्ग कसा सरळ असतो,  ( Central Minister Dr. Bhagwat Karad) पण त्याला देखील युटर्न असतो, तो तुम्ही घेऊ शकता आणि आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच मला माजी मंत्री म्हणून नका हो, तीन दिवसांनी काय होईल ते पहा, असे विधान नुकतेच केले होते. त्यानंतर मुख्यंत्र्यांनी देखील एकत्रित येण्याचे संकेत देत भाजपच्या नेत्यांना साद घातल्याचे दिसून आले. ठाकरे एवढ्यावरच थांबले नाही, तर भाजपच्या गोटात आनंद होईल असे दुसरे विधान केले.

रावसाहेब मी तुमच्या सोबत..

रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात  नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती मुख्यंमत्र्यांना केली, त्याला माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग, मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.

`मला रेल्वे का आवडते कारण, रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असा चिमटा देखील ठाकरे यांनी आपल्या भाषणातून काढला. राज्य आणि देशपातळीवर भाजपच्या नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप,वादविवाद सुरू असतांना या कार्यक्रमातील वातावरण मात्र अत्यंत खेळकर असल्याचे दिसून आले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com