मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी बोलू, पण कोरोना रुग्णांचे हाल होऊ देणार नाही..

परभणी जिल्हयात कोरोना रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यात अशीच भर पडत गेली तर आरोग्य सेवा ऊपलब्ध आहेत काय ?
bjp Mla Meghna Bofrdikar Visit Corona Center Parbhani News
bjp Mla Meghna Bofrdikar Visit Corona Center Parbhani News

परभणी : सध्या परभणी जिल्ह्यात पुरेसे बेड ऊपलब्ध असले तरी नियमित ऑक्सीजन पुरवठा होण्यास अडचणी येत आहेत.  आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता या सर्व समस्यांच्या सोडवणूकीसाठी आपण मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करू. वेळ प्रसंगी आपण केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी देखील संपर्क करू अशी ग्वाही भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा पातळीवर लाॅकडाऊन देखील करण्यात आला. परंतु कोरोना रुग्णांच्या तुलनेत आवश्यक उपाययोजना, बेड, व्हेंटिलेटर, आॅक्सीजनचा पुरवठा याची कमतरता भासते आहेच. शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांचा देखील तुटवडा आहे. 

या पार्श्वभूमीवर मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज कोरोना साथीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या संभाव्य स्थितीचा आढावा घेतला. थेट कोविड सेंटरसह शहरातील विलीगीकरण कक्षांना भेटी देत त्यांनी अधिकाऱ्यांना सुचनाही केल्या. कोरोना रूग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण तत्पर असल्याची ग्वाही, त्यांनी यावेळी दिली.

परभणी जिल्हयात कोरोना रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यात अशीच भर पडत गेली तर आरोग्य सेवा ऊपलब्ध आहेत काय ? याबाबत बोर्डीकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बेड, ऑक्सीजन, औषधी साठा आदिंविषयी माहीती जाणून घेत करावयाच्या अतिरीक्त ऊपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

सध्या परभणीत पुरेसे बेड ऊपलब्ध असले तरी नियमित ऑक्सीजन पुरवठा होण्यात अडचणी येत असल्याची बाब यावेळी निदर्शणास आली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व समस्यांच्या सोडवणूकीसाठी आपण मुख्यमंत्री,  केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू,असेही मेघना बोर्डीकर यांनी  सांगीतले.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com