मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, शिरसाट यांच्या मतदारसंघातील रस्त्यासाठी ५४ कोटी दिले - The Chief Minister kept his word and gave Rs 54 crore for the road in MLA Shirsat's constituency | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, शिरसाट यांच्या मतदारसंघातील रस्त्यासाठी ५४ कोटी दिले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 मार्च 2021

या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मंजूरी दिली.

औरंगाबाद ः शहर व परिसरातील विकासकामांना ठाकरे सरकारकडून गती मिळत आहे. महिनाभरापुर्वी औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मुख्यममंत्र्याकडे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी साजापूर-शरणापूर रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडत असल्याचे सांगितले होते. तेव्हा रस्त्यासाठी आवश्यक निधी देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी तो शब्द पाळत या रस्त्यासाठी ५४ कोटींचा निधी मंजुर केला आहे.

शहर व परिसातील रस्ते विकास कामांना गती मिळाली असून ठाकरे सरकारकडून ज्या ज्या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. साजापूर ते  शरणापूर या पाच  किलोमिटरच्या रस्त्यासाठी आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीची  मागणी केली होती.

त्यानंतर सार्वजनिक  बांधकाम  विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातील  सविस्तार प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मंजूरी दिली. आधी या रस्त्यासाठी १५ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ३८ कोटी ६७ लाख रुपये मंजूर केले आहे.  त्यामुळे या रस्त्यासाठी एकूण ५४ कोटी निधी उपलब्ध झाला आहे.

शहर व परिसरातून राष्ट्रीय महामार्ग, समृद्ध़ी मार्ग जात आहेत. या बरोबरच महानगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते तयार केले  जात आहे. औरंगाबाद पश्चिम  मतदार संघ हा शहरी व ग्रामीण अशा दोन भागात विखुरलेला आहे.  शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, फुटपाथ, ड्रेनेज लाईन, ओपन जीम, गार्डन,  या सुविधा विकसित झाल्या आहेत.

आता ग्रामीण भागातील विकासासाठी  शिरसाट यानी पुढाकार घेत त्यासाठी निधी मिळवण्यावर जोर दिला आहे.. नुकतेच पंढरपुर, नक्षत्रवाडी, रस्त्याच्या रूंदीकरण व मजबूतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वडगाव रस्ता ते  सैलानीबाबा चौकापर्यंत चारपदरी सिमेंट काँक्रेटचा रस्ता देखील करण्यात येणार आहे. याशिवाय एकोड-पाचोड, भालगाव-शेंद्रा, सिंदोन-भिंदोन या मार्गावरील पुलांचे बांधकाम देखील लवकरच केले जाणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख