मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाचे प्रश्न अन् जनभावना समजलीच नाही..

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले परंतु या सरकारला सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवता आले नाही.
mla sambhaji patil nilangekar -Cm Uddhav Thackeray news Aurangabad
mla sambhaji patil nilangekar -Cm Uddhav Thackeray news Aurangabad

औरंगाबाद ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाचे प्रश्न आणि जनभावना समजलीच नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच मराठा आरक्षण मिळू शकले नाही, अशी टीका आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. (The Chief Minister did not understand the issues and sentiments of the Maratha community, said Mla Sambhaji Patil Nilangekar) मराठा समाजातील मुलांसाठी केजी टू पीजी शिक्षण शासनाच्यावतीने देण्यात यावे, यासंदर्भात शासनाने तरतूद करावी, अशी मागणीही निंलगेकर यांनी केली.

जालना व औरंगाबाद येथील दोन दिवसाच्या दौऱ्यानंतर सोमवारी (ता.३१) निंलगेकर पत्रकारांशी बोलत होते. या दौऱ्यात विविध मराठा समाजाच्या संघटना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सरकारने मराठा समाजात संभ्रम निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांनी  केला.

निलंगेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरले आहे. (The Maratha community did not get reservation due to lack of political will.) राजकीय इच्छा शक्तीच्या अभावामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाच्या प्रश्नांनाची जाण नाही, त्यांना या समाजाची जनभावनाच समजली नाही. मराठा समाजाने ५८ मोर्चातुन  आपला भावना व्यक्त केली.

परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकवेळी  पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांच्याकडे बोट दाखवत वेळ मारून नेली. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रश्नाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. (Former Chief Minister Devendra Fadnis gave reservation to the Maratha community) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले परंतु या सरकारला सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवता आले नाही.

अशोक चव्हाणांचे इतर नेते ऐकत नाही..

अशोक चव्हाण यांना संधी होती परंतु मराठवाड्यातील नेत्यांचे इतर विभागातील नेते म्हणणे ऐकून घेत नसल्यामुळे त्यांना ही संधी गमवावी लागली असेही निंलगेकर म्हणाले. मराठा आरक्षणा संदर्भात जो कोणी प्रश्न मांडले भाजप त्याला सहकार्य करेल असे स्पष्ट करतांनाच खासदार छत्रपती संभाजीराजे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो पाठपुरावा करत आहेत, त्यांना आमचा पाठिंबा असेल असेही निलंगेकर यांनी सांगितले.

राज्य शासनाने बजेट मध्ये मराठा समाजातील मुलांसाठी दहा टक्के रक्कम आरक्षित करावी. त्यातून मराठा समाजातील केजी टु पीजीचे शिक्षण पूर्ण करावे. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या युवकांना आर्थिक पाठबळ देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com