नांदेड जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने चव्हाण-चिखलीकर आमने-सामने

नांदेडच्या राजकारणात चिखलीकर विरुद्ध चव्हाण हा संघर्ष नवा नाही. चिखलीकर यांच्याकडून अशोक चव्हाण यांच्यावर वारंवार टीका होत असते.
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नव्हता. परंतु खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाने अर्ज दाखल करताच बुधवारपर्यंत २९ तर शुक्रवारी शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत ६५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी अर्जाचा पाऊस पडला. चिखलीकर अॅक्टीव्ह झाल्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले असून कोणत्या गटातून कुणाला उमेदवारी द्यायची याबद्दलचे नियोजन केल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

नांदेडच्या राजकारणात चिखलीकर विरुद्ध चव्हाण हा संघर्ष नवा नाही. चिखलीकर यांच्याकडून अशोक चव्हाण यांच्यावर वारंवार टीका होत असते. विशेषतः कोरोना काळात सारख्या बैठका घेऊन पालकमंत्री चव्हाण हे अधिकाऱ्यांना कामच करू देत नाही, अशी टीका चिखलीकरांनी केली होती. कोरोना काळात अन्नधान्य वाटपाच्या कार्यक्रमावरून देखील या दोन नेत्यांमध्ये खटके उडाल्याचे पहायला मिळालेे होते.

नांदेड जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत देखील चिखलीकरांच्या सभासदत्वाच्या अर्जावर आक्षेप घेऊन तो अपात्र ठरवण्यात आल्या्मुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता  चिखलीकर गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याला अशोक चव्हाण यांनी देखील मोर्चेबांधणी करत आव्हान दिलेे आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कुणाची सरशी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

यांनी भरले अर्ज

या निवडणुकीसाठी वामनराव देशमुख, विजय सोनवणे, मिर्झा गफार बेग, पंडीत कदम, भारत रॅपनवाड, गोविंदराव भारत, उत्तम राठोड, विक्रम देशमुख, कैलास देशमुख, ईश्वर चव्हाण, रत्नाकर शिंदे, रामराव पाटील, मोहनराव पाटील, दिलीप कंदकुर्ते, लक्ष्मण ठक्करवाड, विजय गंभीरे, व्यंकटेश जिंदम, संगीता पावडे, राजकुमार जाधव, ललिताबाई सूर्यवंशी, मोहनराव पाटील, गंगाधरराव देशमुख कुटुंरकर, रामराव पाटील, गंगाबाई डांगे, निलेश लखपुरे, दीपक पत्रे, सुहास पाटील, सायलू ओनरवाड, श्याम कदम, उमाकांत गोपछडे, मारुती जाधव, डॉ. शीला कदम, कांताबाई जोगदंड, जयश्री आलेगावकर, रुक्मिणी ढगे, स्वामी नुतपेल्लीवार, यादवराव जाधव, विजयसिंह देशमुख, राजेंद्र केशवे, विलास मस्के, निर्मलाबाई शिंदे, बाळासाहेब पाटील खतगावकर, मारुती यंबलवाड, भास्करराव पाटील खतगावकर, भगवान पानेवार, राजेंद्र केशवे, अगडमदास शिनगारे, कमलबाई तावडे, रेखाबाई फुलारे, राजेश्वर मुळे, अनुराधा पाटील, दिनेश शेटे, माधवराव पांडागळे व सुधाकर कौसल्ये आदींनी अर्ज दाखल केले आहेत.

Edited By : jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com