हर्षवर्धन जाधव नौंटकीबाज, त्यांना प्रसिध्दीचा सोस..

एकीकडे राजकारणातून निवृत्ती घेतली, पत्नीला राजकीय उत्तराधिकारी घोषित करायचे आणि मनसेच्या जिल्हाध्यक्षपदावर मात्र कायम राहिचे याचा अर्थ काय? मग राजकारणातून निवृत्ती कसली. दहा वर्ष जाधव मनसे आणि शिवसेनेकडून आमदार होते. त्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातील जनतेचा देखील त्याच्या या नव्या नौटंकीवर विश्वास नाही.
chadrakant kahire, harashvardhan jadhav news
chadrakant kahire, harashvardhan jadhav news

औरंगाबादः हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची केलेली घोषणा म्हणजे नवी नौटंकी आहे, हा माणूस एक नंबरचा नौंटकीबाज असून त्याला प्रसिध्दीचा सोस आहे.  यातूनच त्याने राजकारणातील निवृत्तीचा नवा पब्लिसिटी स्टंट केल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. आध्यात्मिक वाचन करण्यासाठी त्या माणसाचे चारित्र्य सात्विक असले पाहिजे, असा टोलाही खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांना लगावला.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन दिवसांपुर्वी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे सांगत आपल्या उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव या असतील असे जाहीर करत खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीत पराभव होऊन एक वर्ष पुर्ण झाल्याचा म्हणजेच २३ मे चा मुहूर्त जाधव यांनी निवडल्यामुळे याची राज्यभरात चर्चा झाली.

या संदर्भात राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतांनाच ज्या हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, त्यांचे याबद्दल मत काय? हे जाणून घेणे महत्वाचे होते. ‘सरकारनामा‘शी बोलतांना चंद्रकांत खैरे म्हणाले, जाधव यांचा हा नवा पब्लिसिटी स्टंट आहे,

व्हिमजिकल आणि सायको असे हे व्यक्तीमत्व असल्यामुळे कन्नड व एकूणच जिल्ह्यातील लोकांना त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. उलट लोकसभा निवडणुकीत जाधव यांना मतदान करून आमची चूक झाली, आता आम्हाला पश्चाताप होतो, अशा भावना अनेक लोक माझ्याकडे फोन करून व्यक्त करतात.

या माणसाच्या भूलथापांना बळी पडून लोकांनी ट्रॅक्टरला मतदान केले आणि गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबादवर डौलाने फडकणारा भगवा खाली उतरवला गेला. वादग्रस्त आई, वडील, पत्नी बायको यांना छळणारा हा माणूस आज अचानक अध्यात्माच्या गोष्टी करायला लागला याचे आश्चर्य वाटते. पण अध्यात्मासाठी चारित्र आणि मन सात्विक लागते, ते कुठून आणणार.

एकीकडे राजकारणातून निवृत्ती घेतली, पत्नीला राजकीय उत्तराधिकारी घोषित करायचे आणि मनसेच्या जिल्हाध्यक्षपदावर मात्र कायम राहिचे याचा अर्थ काय? मग राजकारणातून निवृत्ती कसली. दहा वर्ष जाधव मनसे आणि शिवसेनेकडून आमदार होते. त्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातील जनतेचा देखील त्याच्या या नव्या नौटंकीवर विश्वास नाही.

सासरे आदरणीय, साक्षात्कार कसा..

ज्या सासऱ्या बद्दल जाधव यांच्या तोंडातून नेहमी अपशब्द निघायचे ते सासरे, ज्या स्व. रायभान जाधव यांना भर बैठकीत अपमानित केले ते आज आदरणीय झाल्याचा साक्षात्कार जाधव यांना कसा झाला? ही एक गंमतच आहे असा चिमटाही खैरे यांनी काढला. लोकसभा निवडणुकीत गद्दारी करत भगवा खाली उतरवण्याचे पाप करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्याच उदयसिंग राजपूत यांनी धूळ चारली.

कोरोनाच्या संकटात आमदार, तालुकाप्रमुख व कन्नडमधील सगळे शिवसैनिक जनतेच्या मदतीसाठी रात्रंदिवस धावून जात आहेत. मी स्वतः या तालुक्यात फिरून लोकांना मदत करतो आहे. शिवसेनेचे या मतदारसंघात खूप काम आहे, लोक आमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी कितीही प्रयत्न केले, तरी लोक आता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, शिवसेना देखील पुन्हा त्यांना आमदार होऊ देणार नाही, अशा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com