पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर तपासणीसाठी केंद्राचे पथक घाटीत..

घाटीतील व्हेंटिलेटर नादुरूस्त असल्यामुळे ते वापराविना पडून होते. या संदर्भात एमआयएम, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांनी आवाज उठवत संबंधित कंपनीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील केली होती.
Central Team in Government Hospital News Aurangabad
Central Team in Government Hospital News Aurangabad

औरंगाबाद ः पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर हे नादुरूस्त आणि निकृष्ट दर्जांचे असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, व काॅंग्रेसने केला आहे. तर व्हेंटिलेटर चांगलेच असून ते हातळण्याचे ज्ञान असणारे तज्ञ नसल्यामुळे व महिनो महिने ते पडून असल्यामुळे काही ठिकाणी तक्रारी आल्याचा दावा भाजपने केला आहे. (Centre's team in the GMCH for ventilator inspection from PM Care Fund.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पीएम केअर फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे आॅडीट करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात (घाटीत) केंद्राचे एक पथक काल व्हेंटिलेटरची तपासणी करण्यासाठी आले होते.

कोरोना काळात पंतप्रधान सहायता निधीतून महाराष्ट्राला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरवरून राज्ययात मोठे वादंग निर्माण झाले आहे. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर नादुरुस्त असून अतिदक्षता विभागात गंभीर रुग्णांसाठी वापरता येणार नाही, असा अहवाल दिला होता. (The ventilator is malfunctioning and cannot be used for critical patients in the intensive care unit) औरंगाबाद खंडपीठाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत ताशेरे ओढले होते.

पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला तब्बल ५ हजार व्हेंटिलेटर पाठवण्यात आले होते. यातून घाटी रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयांसाठी दीडशे व्हेंटिलेटर पाठवण्यात आले होते. (Political parties had also raised their voices and demanded action against the company concerned.) घाटीतील व्हेंटिलेटर नादुरूस्त असल्यामुळे ते वापराविना पडून होते. या संदर्भात एमआयएम, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांनी आवाज उठवत संबंधित कंपनीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. 

घाटीतील व्हेंटिलेटर  तपासणीसाठी नवी दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील डॉ. रूपेश यादव आणि सफदरजंग रुग्णालयातील डॉ. आरिम चौधरी हे दोघे औरंगाबादेत आले होते. गुरुवारी त्यांनी व्हेंटिलेटरची पाहणी केली, आज ते आपला अहवाल देणार असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

घाटी रुग्णालयाने व्हेंटिलेटर वापरण्या योग्य नसल्याचा अहवाल दिल्यानंतर देखील केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात व्हेंटिलेटर मध्ये कुठलाही दोष नसल्याचे म्हटले होते.  तर दुसरीकडे घाटी रुग्णालयाने आपल्याकडे व्हेंटिलेटर हाताळण्याचा अनुभव असलेले प्रशिक्षित २६९ कर्मचारी असल्याचे स्पष्ट केले होते.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com