मराठा आरक्षणावर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी..

आरक्षणाचा अधिकार हा विषय राज्यस्तरावरील असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यास ही स्थगिती उठूशकेल असा मला विश्वास आहे.
Shivsena Mp Ompraksh Raje Nimabalkar-Martha Reservation News
Shivsena Mp Ompraksh Raje Nimabalkar-Martha Reservation News

उस्मानाबाद : केंद्र सरकारने तामिळनाडू सरकारचे आरक्षण कायम राहण्यासाठी ज्या प्रकारे शपथ पत्र सुप्रीम कोर्टात दिले, तसेच शपथपत्र मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी सुप्रीम कोर्टात द्यावे, अशी मागणी उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत केली.

मराठा आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला देखील नोटीस दिल्यामुळे मराठा आरक्षणावर केंद्र सरकारची भूमिका मांडण्याची संधी या निमित्ताने चालून आल्याचे महाराष्ट्रातील महाविका आघाडी सरकार व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले होते.

लोकसभेत शून्य प्रहारच्या माध्यमातून खासदार राजेनिंबाळकर यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. राजेनिंबाळकर म्हणाले, राज्यसरकारने कायदेशीर बाबीचा अभ्यास केला होता, त्यानंतर उच्च न्यायालयात सुध्दा हे आरक्षण मान्य करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने मात्र मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे.

आता केंद्र सरकारने यात ठोस भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करावे. आरक्षणाचा अधिकार हा विषय राज्यस्तरावरील असल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यास ही स्थगिती उठू शकेल असा मला विश्वास आहे. याआधी तामिळनाडू राज्यात देखील अशा प्रकारे आरक्षण देण्यात आले आहे, याकडे देखील राजेनिंबाळकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

केंद्र सरकारने ठोस भुमिका घेऊन प्रतिज्ञापत्र दिल्यास मराठा समाजाच्या लाखो युवकांचे भविष्य यामुळे सुखकर होणार आहे. सध्या मराठा तरुणांचे भविष्य अंधातरी असुन त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता केंद्रसरकारकडून मध्यस्थी गरजेची असल्याचे खासदार राजेनिंबाळकर म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com