पीठलं-भाकरी अन् ठेचा; कराडांची जनआशिर्वाद यात्रा जोरात..

हिंगोलीत डाॅ. कराड यांनी एका शेतकऱ्याच्या घरी चक्क बाजीवर बसून पिठलं-भाकरी आणि ठेचा खात एखाद्या सामान्य व्यक्ती प्रमाणे त्याच्याशी चर्चा केली.
Dr. Bhagwat Karads Jan Ashirwad Rally News Aurangabad
Dr. Bhagwat Karads Jan Ashirwad Rally News Aurangabad

औरंगाबाद ः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची जनआशिर्वाद यात्रा सध्या जोरात सुरू आहे. परळीत दाखल झाल्यानंतर गोपीनाथ गडावर स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांनी यात्रेला सुरूवात केली. (Central Finance Minister Dr. Krads Jan Ashirwad Rally In Marathwada.) परळी व गोपीनाथ गडावरील घोषणाबाजी वगळता परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात त्यांच्या जनआशिर्वाद यात्रेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठकिणी वाजत-गाजत, ढोलताशांच्या दणदणाटात कराड यांचे स्वागत करण्यात आले.

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाल्यानंतर कराड विरुद्ध पंकजा व त्यांचे समर्थक असा संघर्ष निर्माण झाला होता.  या पार्श्वभूमीवर जनआशिर्वाद यात्रेची सुरूवात थेट परळीतून करण्याचा निर्णय दिल्लीतून घेण्यात आला. (Bjp leader Pankaja Munde) त्यामुळे कराड दिल्लीहून थेट परळीत दाखल झाले, अर्थात त्यांना पंकजा समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. (Mla Ratnakar Gutte, Gangakhed) पंकजा मुंडेंच्या निवासस्थानाबाहेर हा प्रकार घडल्यानंतर पुन्हा गोपीनाथ गडावर देखील घोषणबाजी, त्यानंतर पकंजांकडून समर्थकांना झापणे हा प्रकार घडला.

पण गोपीनाथ गड सोडून गंगाखेड, पालममध्ये कराडांची जनआशिर्वाद यात्रा पोहचली आणि कराड विरोध नाहीसा झाला. गंगाखेडमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कराड यांचे भव्य स्वागत केले, पुढे परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात देखील कराडांची यात्रा कुठल्याही विरोधाशिवाय व्यवस्थीत पार पडल्याचे पहायला मिळाले. स्थानिक भाजप आमदार, लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छाही दिल्या. यात नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता.

कुणाच्या काळात मदत अधिक मिळायची?

हिंगोलीत डाॅ. कराड यांनी एका शेतकऱ्याच्या घरी चक्क बाजीवर बसून पिठलं-भाकरी आणि ठेचा खात एखाद्या सामान्य व्यक्ती प्रमाणे त्याच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांना मिळणारी मदत फडणवीस सरकारच्या काळात अधिक मिळत होती की, आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये असा, प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. एकदंरित परळी, गोपीनाथ गडावरील प्रकार वगळला तर कराड यांना मराठवाड्यात इतर कुठेही पंकजा समर्थकांचा रोष किंवा विरोध दिसून आला नाही.

उलट सगळीकडे कराड यांचे स्वागत झाल्यामुळे जनआशिर्वाद यात्रेचा उत्साह बळावला होता. कराड मंत्री झाल्यानंतरच्या या पहिल्याच दौऱ्यात ते केंद्राकडून जनतेसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती लोकांना देत आहेत. अर्थ राज्यमंत्री म्हणून मराठवाड्यातील जनेतेच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास देतांना मोदींच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन कराड करतांना दिसत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com