police fir file against bjp activities news
police fir file against bjp activities news

भाजप शहराध्यक्षासह पंधरा जणांविरुध्द गुन्हा दाखल

दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलमंडी चौकात श्रीरामाचे मोठे पोस्टर लावून पुजन केले. तसेच नागरिकांना राम मंदिर भुमीपूजन सोहळ्याच्या शुभेच्छा देत मिठाईचे देखील वाटप केले. याशिवाय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

औरंगाबाद ः अयोध्येत रामजन्मूभी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भुमीपूजनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याचा आनंदोस्तव साजरा करून श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करणाऱ्या भाजप शहर जिल्हाध्यक्षासह भाजपच्या पंधरा कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. असे असतांना भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित जमा होऊन राम पुजन करत पेढे वाटले होते.

अयोध्येत राम मंदिराच्या भुमीपूजनाचा सोहळा पार पडत असतांनी इकडे देशभरात भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाके फोडत नागरिकांना पेढे, लाडू वाटून भाजपचे कार्यकर्ते आनंद साजरा करत होते. ठिकठिकाणी दिवे, घरावर भगवे झेंडे, मंदिरात पूजाअर्चा व भजन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.

कोरोनाचा वाढता धोका आणि सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता राज्य सरकाने कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी टाकलेली आहे. गर्दी होऊ नये म्हणून गेल्या चार महिन्यांपासून शहरात जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आला आहे.

त्यामुळे गुडीपाडवा, रमझान, आषाढीची वारी, बकरी ईद हे सगळे धार्मिक सण नागरिकांनी घरातच साजरे करावे असे आवाहन राज्य सरकार व पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. असे असतांना काल गुलमंडी येथे भाजपचे शहर-जिल्‍हाध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते जमले होते.

दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलमंडी चौकात श्रीरामाचे मोठे पोस्टर लावून पुजन केले. तसेच नागरिकांना राम मंदिर भुमीपूजन सोहळ्याच्या शुभेच्छा देत मिठाईचे देखील वाटप केले. याशिवाय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना जमावबंदी आदेश लागू असल्याचे सांगत कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला, पण त्यांनी न ऐकता अर्धातास पुजन, घोषणाबाजी आणि पेढे वाटप केले. त्यानंतरच हे सगळे कार्यकर्ते तिथून निघून गेले. या प्रकरणी बंदोबस्तावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप मोदी यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह अन्य पंधरा जणांविरुध्द सिटीचौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

त्यानूसार संजय केणेकेर, माजी नगरसेवक अनिल मकरिये, माजी महापौर भगवान घडामोडे, लता दलाल, समीर राजूरकर, प्रमोद राठोड, दयाराम बसैये, प्रवीण बसैये, राजु मेहता, दिनेश बसैये, संजय भादवे, नितीन चित्ते, मनिषा मुंढे, दिपक ढाकणे, दिव्या मराठे यांच्या विरुध्द सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, राज्याच्या विविध भागात सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत श्रीरामाचे पुजन व कार्यक्रम घेतल्याबद्दल भाजप कार्यकर्त्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येय यांनी महाराष्ट्रात मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com