आमदार शिरसाट यांच्याकडून घाटीला कार्डियाक अॅम्ब्युलन्स; आणखी पाच लवकरच देणार..

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील मनापासून आभार मानतो, की त्यांनी कोरोना महामारीच्या काळात आम्हा लोकप्रतिनिधींना स्थानिक विकास निधीतून १ कोटी रुपये आरोग्य व वैद्यकीय सुविधांवर खर्च करण्याची परवानगी दिली.
Shivsena Mla Sanjay Sirsat News Aurangabad
Shivsena Mla Sanjay Sirsat News Aurangabad

औरंगाबाद ः : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांची होणारी फरपट पाहता गंभीर आजारी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, त्यांचे स्थलांतर करणे सोयीचे जावे. (A cardiac ambulance to the valley from MLA Shirsat; Will give five more soon ) या भावनेतून शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून शासकीय रुग्णालयाला (घाटी) सर्व सोयींनी युक्त अशी कार्डिया अॅम्बुलन्स आज सुपूर्द केली.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते घाटीच्या अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्याकडे अॅम्ब्युलन्सची चावी देण्यात आली. रुग्णांची सेवा आणि आरोग्य विभागाला हातभार लागावा या भावनेतून आपण कार्डियाक अॅम्ब्यूलन्स देण्याचा निर्णय घेतल्याचे संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले. (It is planned to provide six updated cardiac ambulances.) स्थानिक विकास निधीतून सहा अद्यावत कार्डियाक रुग्णवाहिका देण्याचे ठरवले आहे. त्यातील एका रुग्णवाहिकेचे आज लोकार्पण झाले. 
 

यावेळी आमदार संजय शिरसाट म्हणाले, कोरोना काळात सर्व रुग्णांना तात्काळ सेवा देता यावी तसेच भविष्यातील संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी औरंगाबाद शहर व इतरत्र आपली वैद्यकीय सेवा सज्ज असणे आवश्यक आहे. (The health department will definitely have a hand in serving the patients.) जनसामान्यांसह आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जीवन मौल्यवान असून ते सुरक्षित असणे मला गरजेचे वाटते. त्यामुळे मी सुसज्ज आणि अद्यावत रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला. यामुळे रुग्णांची सेवा करण्यासाठी आरोग्य विभागाला निश्चितच हातभार लागेल.

या कार्डियक रुग्णवाहिकेत  डॉक्टरांसह औषधे, ऑक्सिजन, ईसीजी, व्हेंटिलेटर, सीरिज पंप अशा सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे गंभीर रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.  घाटीकडे व इतर शासकीय रुग्णालयांकडे साध्या रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. पण कार्डियाक अॅम्ब्युलन्स नसल्याने त्याची मला खरंच गरज वाटली.

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील मनापासून आभार मानतो, की त्यांनी कोरोना महामारीच्या काळात आम्हा लोकप्रतिनिधींना स्थानिक विकास निधीतून १ कोटी रुपये आरोग्य व वैद्यकीय सुविधांवर खर्च करण्याची परवानगी दिली, असे शिरसाट म्हणाले. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे, त्यामुळे रुग्णवाहिकां देखील अपूऱ्या पडतात.  काहीवेळी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल करता येत नाही.आमदार संजय शिरसाट यांनी दिलेली अद्यावत रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल, अशा भावना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी व्यक्त केल्या. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com