बलात्काऱ्यांना भरचौकात फाशीची कायद्यात तरतूद करता येणार नाही का?

पिडिता सोबत झालेला प्रकार हा अमानवीय, अमानूष असाच आहे. त्यामुळे या घटनेचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे.
Mp imtiaz jalil twit news aurangabad
Mp imtiaz jalil twit news aurangabad

औरंगाबाद ः साकीनाका येथील घटना दुर्दैवी, चीड आणणारी आणि विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी आहे. मला माहिती आहे की, आपल्या देशात कायदेशीररित्या या गोष्टीला परवानगी नाही.(Can't the law provide for the death penalty for rapists?) पण बलात्कारासारख्या घटना रोखून नराधमांवर जरब बसवायचा असेल तर अरब राष्ट्रांप्रमाणे अशा गुन्हेगारांना भर चौकात थेट फाशी देण्याची तरतूद कायद्यात करायला हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साकीनाका घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे ट्विट केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून इम्तियाज जलील यांनी केलेल्या ट्विटमध्ये वरील मागणी केली आहे. (Aimim Mp Imtiaz Jalil, Aurangabad) महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार व पिडितेच्या मृत्यूने समाजात संतापाचे वातावरण आहे. आरोपीला फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी सर्वच स्तरातून आहे.

पिडिता सोबत झालेला प्रकार हा अमानवीय, अमानूष असाच आहे. त्यामुळे या घटनेचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. (Chief Minister Uddhav Thackeray, Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून पोलिसांनी आपली संवेदनशीलता दाखवून द्यावी, असे आवाहन करत आरोपीला कठोर शासन करण्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात मुख्यंमत्री कार्यालयाने एक ट्विट देखील केले आहे.  या ट्विटला खासदार इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी खळबळजनक मागणी केली. अरब राष्ट्रांमध्ये महिलांवर बलात्कार, अत्याचार करणाऱ्यांना जशी भरचौकात फाशीची शिक्षा दिली जाते, तशीच तरतूद आपल्या कायद्यात करता येणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

इम्तियाज आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, `मला माहित आहे की कायदेशीररित्या आपल्या देशात याला परवानगी नाही. पण आम्ही गुन्हेगारांना मुख्य शहर जंक्शनवर पूर्ण सार्वजनिक दृष्टिकोनात फाशी देण्यासाठी कायद्यात सुधारणा करू शकत नाही का? जसे बलात्कार करणाऱ्यांसाठी काही अरब देशात केले जातात.

कायद्याला घाबरत नाही अशा व्यक्तींसाठी हे एक मजबूत प्रतिबंधक पाऊल ठरू शकेल`. इम्तियाज जलील यांनी ही खळबळजनक मागणी केली असली तरी हीच सर्वसामान्यांची देखील भावना असल्याचे समाज माध्यमांवरील प्रतिक्रियांमधून दिसून आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com