एमपीएससीच्या परीक्षा रद्द करणे, हे सरकारचे अपयश

अचानक परिक्षा रद्द करण्याचा निर्णय हा या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो.
Mpsc Exam-Pankaja Munde Reaction News- Mumbai
Mpsc Exam-Pankaja Munde Reaction News- Mumbai

मुंबई : एमपीएससीच्या परीक्षांची तयारी राज्यभराती विद्यार्थी अनेक वर्षांपासून करत असतात. विशेषः ग्रामीण भागातून पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या शहरात हे विद्यार्थी राहतात, घरची बेताची परिस्थिती असतांना त्यांचे पालक डोळ्यात एक भविष्य़ साठवून त्यांना अभ्यासासाठी आर्थिक मदत पाठवत असतात. सगळी तयारी झालेली असतांना अचानक परिक्षा रद्द करण्याचा निर्णय हा या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. परीक्षा रद्द करणे हे सरकारचे अपयश असल्याची टीका भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने येत्या १४ मार्च रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरांमध्ये रस्त्यावर उतरले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घ्या, अशी मागणी लावून धरत आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णया विरोधात राजकीय नेत्यांकडून देखील आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंकजा मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना हा निर्णय एकट्या मुख्यमंत्र्यांचा नसतो, मंत्रीमंडळातील इतर नेत्यांना देखील या निर्णयाची कल्पना असले. मग याचे परिणाम काय होतील हे न समजण्या इतके नवे नेते सरकारमध्ये कुणीही नाही. वर्षभर अभ्यास करून ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला तर विद्यार्थ्यांचा उद्रेक नैसर्गिक आहे. अशा वातावरणाला समोर जाणं गरजेचं आहे.

एमपीएससीच्या परीक्षा देणारे ९० टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले असतात. खूप कष्ट आणि मेहनतीने ते इथवर पोहचलेले आहेत. परीक्षा पुढे ढकलंण हा त्यांच्यावर अन्याय आहे. मुळात हा निर्णय का घेतला गेला?  तो सरकार बदलणार आहे की नाही? एखाद्या गोष्टींचे क्रेडीट घेता, तशी जबादारी देखील सरकारचीच असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

निर्णय घेतांना या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. मी मारल्या सारखं करतो, तू रडल्या सारखं कर असाच हा प्रकार सुरू आहे. सगळं चालू असतांना परीक्षा रद्द करणे  याला नियोजन म्हणत नाही, तर हे सरकारचे अपयश आहे, याचा पुनरुच्चार देखील पंकजा मुंडे यांनी केला. हे तीन पक्षांच सरकार आहे, त्यामुळे श्रेय आणि अपयश देखील तिंघाचेच म्हणावे लागेल. कॅबिनेट मंत्र्यांना जर हा निर्णय माहित नसेल तर सावळा गोंधळ आहे, अशी टीकाही पंकजा यांनी केली.

मराठा- ओबीसी वाद दुर्दैवी

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा निर्माण झालेला वाद दुर्दैवी आहे. मराठा समाजावर वेळोवेळी अन्याय झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच माझी भूमिका असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बोलतांना पंकजा यांनी राजकारणातली लेन्स छोटी होत असल्याची खंत व्यक्त केली. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्या ऐवजी प्रत्येकजण आपापल्या पक्षा पुरतंच पाहतोय, मी विधानसभेत नसले तरी पुर्वी कॅबिनेट मंत्री होते,असेही त्या म्हणाल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com