वैद्यकीय प्रवेशाचा ७०-३० फॉर्मुला रद्द करा..

वास्तविक पाहता मराठवाडा विभागाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांत वैद्यकीय महाविद्यालये व या अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या किती तरी पटीने जास्त आहे. प्रचलित सूत्रामुळे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांवर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे.
parbhnai mp jadhav letter to cm for medical admition formula news
parbhnai mp jadhav letter to cm for medical admition formula news

परभणीः वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थांना लागू  करण्यात आलेला ७०-३० टक्केचा फॉर्मुला हा अन्यायकारक आहे. ही बाब समानतेच्या तत्त्वाचा भंग करणारी आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर घोर अन्याय करणारी आहे. त्यामुळे तातडीने हा फॉर्मुला रद्द करावा, अशी आग्रही मागणी परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

'राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (NEET)' मध्ये पात्र झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात विभागनिहाय ७०:३० टक्के वाटा हे सूत्र राबविले जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे तीन विभाग करून महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एकूण जागांपैकी ऑल इंडियाचा १५ टक्के वाटा वजा करून उर्वरित जागांसाठी ७० टक्के वाटा विभागाचा आणि ३० वाटा राज्याचा या सूत्रानुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येते.

वास्तविक पाहता मराठवाडा विभागाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांत वैद्यकीय महाविद्यालये व या अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या किती तरी पटीने जास्त आहे. प्रचलित सूत्रामुळे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांवर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे.

विशेष म्हणजे ७०:३० टक्के हे सूत्र देशातील इतर कुठल्याही राज्यात राबविले जात नसतांना या सूत्रामुळे दरवर्षी मराठवाड्यातील किमान ५०० विद्यार्थी डॉक्टर बनण्यापासून वंचित राहात आहेत. ही बाब शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या मराठवाडा विभागाच्या दृष्टीने हानीकारक आणि त्याहीपेक्षा अन्यायकारक असल्याचे खासदार जाधव यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही सामाजिक तथा जातीनिहाय आरक्षणानुसार राबविली जात असताना पुन्हा विभागनिहाय आरक्षण कशासाठी? असा प्रश्न देखील जाधव यांनी उपस्थित केला आहे. ७०:३० टक्के सूत्रामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना 'NEET'  मध्ये पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत जवळपास ४०-५० गुण अधिक घ्यावे लागतात.

ही बाब समानतेच्या तत्त्वाचा भंग करणारी आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर घोर अन्याय करणारी आहे. देशातील इतर कुठल्याही राज्यात राबविले जात नसलेले व कोणत्याही कायद्याला धरून नसलेले ७०:३० टक्के हे सूत्र त्वरित रद्द करून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी विनंतीही खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com