Shivsena Mla Pradip jaiswal News Aurangabad
Shivsena Mla Pradip jaiswal News Aurangabad

आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नावाने फोन करून पैशाची मागणी

पैसे ट्रान्सफर करा, मग कुणाला तरी पावती घेऊन पाठवा, असा आग्रह वारंवार फोन करणारी व्यक्ती समोरच्याला करतांना दिसते. याची माहिती प्रदीप जैस्वार यांना कळाल्यावर त्यांनी तातडीने सोशल मिडियावर याचा खुलासा केला.

औरंगाबाद ः खोटी नावे, व्यक्ती असल्याचे सांगून पैशाची मागणी करण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. शिवसेनेचे औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे नाव सांगून पैसे मागितले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील चार-पाच व्यक्तींना मै प्रदीप शिवनारायण जैस्वाल, एमएलए बात कर रहा हू, असे म्हणत ३५ हजार रुपये आॅनलाई ट्रान्सफर करण्यास सदरची व्यक्ती सागंत आहे. या संदर्भात असा फोन आला तर त्या व्यक्तीची थेट पोलिसांत तक्रार करा, असे आवाहन जैस्वाल यांच्याकडून करण्यात आले आहे.

आॅनलाईन फसवणूक करुन सर्वसामान्यांना लुटण्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. परंतु आता थेट आमदाराच्या नावानेच भामटे फोन करून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असल्याचा प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल बोलत आहे असे सांगून एका अज्ञात भामट्याने शहरातील काही लोकांना फोन केल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती प्रदीप जैस्वाल यांच्या आॅफीसमधून बोलत असल्याचे सांगून समोरच्या व्यक्तीशी संवाद साधते. प्रदीप जैस्वाल बोलणार आहेत, असे सांगित्ल्यावर एकजण फोनवर येतो. मै प्रदीप शिवनारायण जैस्वाल एमएलए बोल रहा हू. 

एक अर्जंट काम है, मेरे करीबी रिश्तेदार का बेटा, मुंबई युनिव्हर्सिटी मे पढता है, उसकी ३५ हजार ८६३ रुपये फीस अर्जंट भरणा है. तो आप आॅनलाईन भरके मेरे आॅफीस पे रिस्पीट लेके किसी को भेज दो. मेरा काॅन्स्टेबल दिपक वहा पै है. उसको रिसिप्ट बता कै आप पैसे लेके जाना, असेही व्यक्ती फोनवर सांगते. पैसे घेण्यासाठी रंगारगल्ली किंवा निराला बाजार येथील घरी या, मी मिटिंगमध्ये आहे, असेही ही व्यक्ती सांगते.

पैसे ट्रान्सफर करा, मग कुणाला तरी पावती घेऊन पाठवा, असा आग्रह वारंवार फोन करणारी व्यक्ती समोरच्याला करतांना दिसते. याची माहिती प्रदीप जैस्वार यांना कळाल्यावर त्यांनी तातडीने सोशल मिडियावर याचा खुलासा केला. माझ्या नावाने कुणी पैसे मागत असेल तर त्याच्या विरोधात तातडीने पोलीसांत तक्रार करा, कुणीही फोन करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या अकाऊंट नंबरवर पैसे पाठवू नये, फसवणूक होऊ शकते, असेही जैस्वाल यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात प्रदीप जैस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही. त्यांचे चिरंजवी ऋषीकेश जैस्वाल यांनी या प्रकाराबद्दलची माहिती दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे प्रदीप जैस्वाल हे मुंबईला निघाले आहेत. त्यांच्या नावाने एक व्यक्ती काहीजणांना फोन करत असल्याचे समोर आल्यानंतर आम्ही अशा खोट्या काॅल्सला बळी पडून कुणीही पैसे कुणाच्या खात्यावर पाठवू नये, असे आवाहन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By : Jagdsih Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com