विलासराव देशमुखांना फोन केला, अन् माझ्या वडिलांचे प्राण वाचले..

सर्वात आधी त्यांनी मला धीर दिला, घाबरू नको, तुला माझ्याकडून काय मदत पाहिजे ते सांग? कुठल्या दवाखान्यात वडिलांना न्यायचे, पैशाची अडचण आहे का? मुंबई, पुण्याला न्यायचे असेल तर विमान, हेलिकाॅप्टरची व्यवस्था करायची का? असे अनेक प्रश्न त्यांनी मला केले.
Vilasrao Deshmukh Memories- Mla Rajesh Rathod News Aurangabad
Vilasrao Deshmukh Memories- Mla Rajesh Rathod News Aurangabad

औरंगाबाद ः राजकारणात अनेक नेते होऊन गेले, यापुढेही होतील, पण दिवगंत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता होणे शक्य नाही. राजकारणापलिकडे जाऊन एखाद्या सामान्य कार्यकर्त्याशी नाते कसे जपावे हे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असतांना देखील दाखवून दिले होते. (Called Vilasrao  Deshmukh and saved my father's life, said Mla Rajesh Rathod) एखाद्याने मदत मागावी, अन् समोरच्याने त्याच्यासाठी काही करण्याची तयारी दाखवावी असा, तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो.

विलासराव देशमुख यांना फोन केल्यानंतर त्यांनी जी धडपड आणि धावपळ माझे वडिल माजी आमदार धोंडीराम राठोड यांच्यासाठी केली, ती कदापी विसरू शकणार नाही. (Congress MLA Rajesh Rathore shared his memories with Vilasrao Deshmukh.) विलासराव यांच्यामुळेच माझ्या वडिलांचे प्राण वाचले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील काॅंग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी विलासराव देशमुखांसोबत्या आठवणींना उजाळा दिला.

विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, तर माझे वडील विधान परिषदेचे आमदार. एकदा माझ्या वडिलांना अन्नातून विषबाधा झाली आणि त्यांच्या प्रकृती खालावली. काय करावे सूचत नव्हते, वडिलांचा त्रास मला बघवत नव्हता. काय करावे, कोणत्या डाॅक्टरला दाखवावे काहीच सूचत नव्हते. (Vilasrao Deshmukh Saheb was the Chief Minister of the state, while my father was an MLA of the Legislative Council.)  मी पुरता घाबरलेलो होतो, स्थानिक ठिकाणी उपचार केले, पण वडिलांच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नव्हता. बरं नेमंक काय झालं याचे निदान देखील होत नव्हते, पण वडिलांचा त्रास मात्र काही केल्या कमी होत नव्हता.

मग काहीजणांच्या सांगण्यावरून वडिलांना औरंगाबादला हलवण्याचा निर्णय घेतला. माझ्यावर हा पहिलाच प्रसंग, माझा जीव की प्राण असणारे वडिलच आजाराशी झुंजत असल्याने मी पुरता कोसळलो होतो. कुणाकडे मदत मागावी, कोणत्या डाॅक्टारांना दाखवावे या विंवचनेत असतांना मला कुणी तरी विलासराव देशमुखांना फोन करून काय करता येईल, किंवा कशी मदत होईल हे बघावे असा सल्ला दिला.

राज्यातील विधानसभेचे २८८ व विधान परिषदेचे ७८ आमदार यातील एकाचा मी मुलगा. त्यामुळे मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख फोन उचलतील का? माझ्याशी बोलतील, मदत करतील का? अशी भिती मनात होती. पण हिंमत केली आणि विलासरावांना फोन केला. विशेष म्हणजे एका जाहीर कार्यक्रमात असतांना त्यांनी माझा फोन उचलला. मी घाबरलो होतो, बोलणंही सुचत नव्हतं. मी आमदार धोडीराम राठोड यांचा मुलगा राजेश बोलतोयं अस सांगून मी त्यांना सगळी परिस्थिती आणि वडिलांच्या तब्यतीबद्दल सांगितले.

सर्वात आधी त्यांनी मला धीर दिला, घाबरू नको, तुला माझ्याकडून काय मदत पाहिजे ते सांग? कुठल्या दवाखान्यात वडिलांना न्यायचे, पैशाची अडचण आहे का? मुंबई, पुण्याला न्यायचे असेल तर विमान, हेलिकाॅप्टरची व्यवस्था करायची का? असे अनेक प्रश्न त्यांनी मला केले. (They reassured me, don't be afraid, tell me what help you need from me?) यावर मी औरंगाबादला धूत हाॅस्पीटलमध्ये वडिलांना घेऊन चाललो आहे. तिथे तज्ञ डाॅक्टरांना माझ्या वडिलांवर उपचार कसे मिळतील, यासाठी मदत करा, असे मी त्यांना म्हणालो.

खासदार धूत धावतपळत आले..

विलासरावांशी बोलल्यानंतर मी वडिलांना घेऊन धूत हाॅस्पीटलमध्ये पोहचलो. तो पर्यंत साहेबांनी औरंगाबादेतील डाॅ.कल्याण काळे, यांच्यासह सर्व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना फोनवरून मला सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले होते. धूत हाॅस्पीटलमध्ये अॅम्ब्युलन्स शिरत नाही, तोच काॅग्रेसचे पदाधिकारी मदत व विचारपूस करण्यासाठी पुढे सरसावले. काही मिनिटातच वडिलांना गेटवरून आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तज्ञ डाॅक्टरांची टिम धावाधाव करून वडिलांच्या विविध तपासण्या करण्यासाठी त्यांना घेऊन जात होते. मी मात्र आयसीयूच्या बाहेर जमीनीवर बसून होतो.

वडिलांची प्रकृती बिकट असल्याने मी पार कोसळलो होतो. तेवढ्यात राज्यसभेचे खासदार राजकुमार धूत हाॅस्पीटलमध्ये आले. (Rajya Sabha MP Rajkumar Dhoot came to the hospital.) अगदी माझ्यासमोरून ते गेले, पण माझा त्यांचा परिचय नसल्याने मी ओळखले नाही. पण ते प्रचंड घाईत आणि तणावात होते, राजेश राठोड कोण आहे? अशी हाक त्यांनी मारली आणि मी उठून उभा राहिलो. माझ्या जवळ येत ते म्हणाले, तुम्ही आमदार धोंडीराम राठोड यांचे चिरंजीव आहात का? मी त्यांना हो म्हणालो, तेव्हा मला विलासराव देशमुख साहेबांचा फोन आला होता, ते याआधी कधीच मला अशा पद्धतीने बोलले नव्हते, जसे आज बोलले असे ते म्हणाले.

मी त्यांनी विचारले काय झाले? साहेब तुम्हाला काय म्हणाले? यावर धोंडीराम राठोड यांच्यावर तज्ञ डाॅक्टारांकडून उपचार करा, काय पाहिजे ते सगळे उपलब्ध करून द्या, त्यांना काही झाले तर गाठ माझ्याशी आहे, हे विलासरावांचे शब्द होते. सुदैवाने सगळ्यांचे प्रयत्न फळाला आले. वडिलांवर उपचार झाले आणि ते या आजारातून बरे झाले. एका फोनची दखल घेऊन विलासराव देशमुख साहेबांनी माझ्या वडिलांसाठी जी काही धावपळ केली, अर्ध्या रात्री जरी मी फोन केला तर तो त्यांनी क्षणार्धात उचलला, मला योग्य मार्गदर्शन तर केले पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे धीर दिला.

या संकटातून त्यांनी मला माझ्या कुटुंबियांना आणि वडिलांना वाचवले. त्यांचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. त्यांच्या आठवणी कायम स्मरणार आहेतच, त्या कधीच मिटू शकणार नाही. (I had an emotional relationship with Vilasrao Deshmukh.) माझ्या कार्यालयात साहेबांचा एक मोठा फोटो मी लावलेला आहे. यावरून मला याचे कारण देखील अनेकदा विचारले गेले, तुम्ही त्यांच्या गटाचे होते का? असेही बोलले गेले. पण मी त्यांना एकच उत्तर अजूनही देतो, राजकारणी म्हणून नाही, पण एक व्यक्ती म्हणून माझे विलासराव देशमुख यांच्यांशी भावनिक नाते जडले होते. ते या फोटोच्या माध्यमातून मी कायम जपणार आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com