अडीचशे गोरगरिब ह्दय रुग्णांचे आशिर्वाद, याच अजित पवारांना शुभेच्छा..

अजित पवार हे वाढदिवसाच्या दिवशीही बुके न स्विकारता केवळ कामच करताना दिसतात. कोविडच्या काळात त्यांचे काम आणि निर्णय संबंध महाराष्ट्राने पाहिले आहेत. म्हणूनच कामातून आणि आरोग्य उपक्रमातून त्यांना शुभेच्छा देण्याचा निर्णय घेतला.- संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार, बीड.
mla sandip khsirsagar birthday wish to Ajit Pawar news beed
mla sandip khsirsagar birthday wish to Ajit Pawar news beed

बीड : फक्त काम करत राहायचे आणि त्याचे श्रेय घ्यायचे नाही, असा अजित पवारांचा शिरस्ता आहे. कोविड काळात तर त्यांचे काम संबंध राज्याने पाहीले. काम केल्यानंतर त्यांना आभार मानलेलेही आवडत नाही. वाढदिवसाला शुभेच्छा व बुके स्विकारण्याऐवजी ते काम करत राहतात. म्हणून सामाजिक व आरोग्य विषयक कामाच्या माध्यमातूनच त्यांना शुभेच्छा देण्याचा संकल्प आपण घेतल्याचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोफत अँजीओग्राफी व अँजीओप्लास्टी शिबीर आयोजित केले आहे. यासंदर्भात संदीप क्षीरसागर `सरकारनामा`,शी बोलतांना म्हणाले,  महिनाभर चालणाऱ्या शिबीरात मराठवाड्यातून अडीचशेंवर लोकांनी नोंदणी केली आहे. (Blessings of two hundred and fifty poor heart patients, best wishes to Ajit Pawar. Said, Ncp Mla Sandip Kshirsagar, Beed) येथील काकू - नाना मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व मोतीरामजी वरपे कार्डिअॅक युनिटमध्ये तज्ज्ञ डॉक्टर मोफत अँजीओग्राफी करणार असून गरज असलेल्यांची तज्ज्ञांमार्फत मोफत अँजीओप्लास्टी होणार आहे.

ह्दयाशी संबंधीत आजारावर उपचारासाठी औरंगाबाद, पुणे व मुंबईला जाऊन मोठा खर्च करावा लागणार खर्च माझ्या नेत्याच्या वाढदिवसामुळे वाचणार आहे.  या शिबिरात उपचार घेऊन जे शेकडो ह्दयरुग्ण बरे होऊन जातील आणि मनापासून आशिर्वाद देतील, त्याच अजित पवार यांच्यासाठी शुभेच्छा ठरतील असेही संदीप क्षीरसागर यांनी नमूद केले. (Ncp Leader and Deputy Chief Minister Ajit Pawar, Maharashtra) महिनाभर हे महाशिबीर चालणार आहे, आजही शहरात आणि जिल्ह्यात अजित पवारांच्या वाढदिवसा निमित्त `संकल्प निरोगी बीड`, अभियानांतर्गत  विविध उपक्रम आयोजित केले आहेत.

आभार मानलेले आवडत नाही..

अजित पवारांकडे कुठलेही काम घेऊन गेल्यानंतर त्यांनी रिकाम्या हाताने पाठविले नाही.  बीड जिल्हा रुग्णालयात अडीचशेंवरुन एक हजार खाटा आणि सातशे खाटांना ऑक्सीजन बेडची सुविधा पालकमंत्री धनंजय मुंडें व अजित पवारांमुळेच झाल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. विशेष म्हणजे विकास कामांना मंजूरी आणि निधी दिल्यानंतर त्यांना आभार म्हणलेले देखील पटत नाही.

उलट तुम्ही लोकांसाठी काम करता, लोकांचे प्रश्न सोडविता याचाच अभिमान वाटतो असे ते म्हणतात. मतदार संघातील शहर व ग्रामीण भागातील विकासाला त्यांनी कोट्यावधीचा निधी दिल्याने विकासाचा २५ वर्षांपासूनचा अनुषेश भरुन काढण्यास मदत होत असल्याचेही संदीप क्षीरसागर आवर्जून सांगतात.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com