सत्तेसाठी भाजपवाल्यांची धडपड; म्हणून मराठा,ओबीसी आरक्षणावर दिशाभूल .. - BJP's struggle for power; So Maratha, misguided on OBC reservation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

सत्तेसाठी भाजपवाल्यांची धडपड; म्हणून मराठा,ओबीसी आरक्षणावर दिशाभूल ..

गणेश पांडे
मंगळवार, 29 जून 2021

मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणासंदर्भात केंद्र शासनाला अधिकार आहेत यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो.

परभणी  : सत्तेच्या बाहेर राहणे भाजपवाल्यांना सहन होत नाही, सत्तेसाठी त्यांची धडपड सुरू आहे.  त्यामुळेच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचे काम ते सातत्याने करत असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी  केली. (BJP's struggle for power; So Maratha, misguided on OBC reservation) अशोक चव्हाण परभणीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा, ओबीसी आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांनाच भाजपवर टीका केली.

चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाला अधिकार नसल्यामुळे या प्रकरणात निर्णय घेता येत नाही, हे अधिकार केंद्र शासनाला असल्यामुळे केंद्रीय स्तरावरूनच याबद्दल निर्णय अपेक्षित आहे. (PWD Minister Ashok Chavan) राज्यातील सत्ता भाजपच्या हातातून गेल्यामुळे त्यांची सत्तेसाठी धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे आरक्षण या विषयावर भाजपाकडून चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवल्या जात आहेत. (Maratha, Obc Reservation)

मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणासंदर्भात केंद्र शासनाला अधिकार आहेत यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो. त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात विनंतीही केली आहे, परंतु त्याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही.  

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा करून दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कामे मार्गी लागायला हवी होती, ती झाली नाहीत असाही आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. आरक्षणाची ५० टक्क्यांची अट शिथिल करावी त्याशिवाय कोणताही प्रश्न मार्गी लागणार नाही, असेही ते म्हणाले. 

ओबीसी समाजाच्या आरक्षणा संदर्भात बोलतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी योग्य निर्णय घेतला नाही. त्यामुळे ओबीसी समाजावर ही वेळ आली आहे. केंद्र सरकारने नीती आयोगाचा डाटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. केंद्र सरकार जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत यातून मार्ग निघू शकत नाही, असे चव्हाण म्हणाले. 

हे ही वाचा ः खुद्द अजितदादाही या कामात चूक काढू शकणार नाहीत..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख