सत्तारांच्या मतदारसंघात भाजप पुन्हा उभारी घेणार...

इद्रीस मुलताणी हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्ष ते भाजपच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ त्यांना चिटणीसपदाच्या रुपाने मिळाल्याची चर्चा आहे. तालुक्यातील तांडा बाजार ग्रामपंचायतीच्या उपसरंपच पदापासून मुलतानी यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
bjp come back again sillod news
bjp come back again sillod news

औरंगाबादः भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत ग्रामीण भागातील एखाद्या पदाधिकाऱ्याला जिल्हा आणि राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळवून देण्याची परंपरा पक्षाने कायम राखली आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलताणी यांची प्रदेश चिटणीसपदी झालेली निवड याचे उदाहरण म्हणावे लागेल.

सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघ हा कधीकाळी भाजपचा गड म्हणून ओळखला जायचा. पण गेल्या पंधरा वर्षापासून आधी कॉंग्रेस आणि आता शिवसेनेने या मतदारसंघावर वर्चस्व मिळवले आहे.

विद्यमान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मजबुत पकड आणि एकाधिकारशाही मोडून काढण्याचे भाजपचे प्रयत्न तडजोडीच्या राजकारणामुळे यशस्वी होऊ शकले नाही. पण आता तालुक्यातील राजकारण बदलले असून भाजपने इद्रीस मुलताणी यांना प्रदेश कार्यकारणीत स्थान देत मतदारसंघात नव्याने उभारी घेण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे बोलले जाते.

इद्रीस मुलताणी हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्ष ते भाजपच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ त्यांना चिटणीसपदाच्या रुपाने मिळाल्याची चर्चा आहे. तालुक्यातील तांडा बाजार ग्रामपंचायतीच्या उपसरंपच पदापासून मुलतानी यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

पुढे सर्वसामान्यांशी संपर्क वाढवत त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्यावर अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष, भाजपा जिल्हा चिटणीस, प्रदेश चिटणीस अल्पसंख्याक आघाडी, पंचायत समिती सदस्य सिल्लोड, जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, उपसभापती पंचायत समिती अशा संघटनात्मक आणि राजकीय पदांची जबाबदारी आली.

या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्यानंतर तालुक्याच्या राजकारणात मुलताणी यांचा चांगलाच जम बसला. मुलतानी यांचे वडीलही भाजपाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यामुळे पक्षाची ध्येय धोरण आणि कार्यपद्धती इद्रीस यांच्या चांगलीच अंगवळणी पडली होती. रावसाहेब दानवे यांच्या तालमीत तयार झालेल्या इद्रीस मुलताणी यांनी तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पद मिळाल्यानंतर त्यांना प्रशासकीय कामाचा देखील अनुभव घेता आला. संघटनात्मक कामाच्या नियोजनात हातखंडा असल्याने अनेक निवडणूकीमध्ये प्रचार व नियोजनाची जबादारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
 
इद्रीस मुलताणी यांची प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील एक नवा चेहरा भाजपच्या प्रदेश कार्यकरणीत सहभागी झाला आहे. आता त्यांच्या या निवडीचा तालुक्यातील भाजपला उभारी मिळण्यात किती फायदा होतो हे लवकरच स्पष्ट होईल.

मुलताणी यांच्या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार, डॉ भागवत कराड, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार प्रशांत बंब, यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com