सरकार पडेल, ही अपेक्षा आता भाजपने बाळगू नये; नितीन राऊत यांचा टोला.. - BJP should not expect this government to fall; Nitin Raut | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार पडेल, ही अपेक्षा आता भाजपने बाळगू नये; नितीन राऊत यांचा टोला..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

आमचे सरकार निश्चितच पाच वर्ष टिकेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यामुळे भाजपने आता सरकार पाडण्याचे प्रयत्न करू नयेत.

औरंगाबाद ः महाराष्ट्रातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. तीन पक्ष असले तरी आमच्या चांगला समन्वय आहे, त्यामुळे आम्ही पाच वर्षाचा कार्यकाळ निश्चितच पुर्ण करू. त्यामुळे सरकार पडेल अशी अपेक्षा भाजपने बाळगू नये, असा टोला उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला. (BJP should not expect this government to fall; Said Minister Nitin Raut) वीज बील माफी शक्य नाही, त्यासाठी केंद्राने मदत केली, तर विचार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काॅंग्रेसचे नेते तथा राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. (Energy Minister Nitin Raut was on a visit to Aurangabad today.) महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरीची चर्चा, आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, अशी काॅंग्रेसकडून होणारी ओरड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकुतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट, या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल का? पाच वर्ष टिकेल? यासह वीजबील माफी व अन्य विषायवर राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांमध्ये चांगले आणि समन्वयाचे संबंध आहेत. (The government has no problem completing its term.) मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे सरकारला कार्यकाळ पुर्ण करण्यात कुठलीच अडचण नाही.

आमचे सरकार निश्चितच पाच वर्ष टिकेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यामुळे भाजपने आता सरकार पाडण्याचे प्रयत्न करू नयेत, किंवा तशी अपेक्षाही बाळगू नये, असा टोला नितीन राऊत यांनी लगावला. हे सरकार पडणार अशी आवई भाजपकडून नेहमीच उठवली जाते, तसे प्रयत्न देखील त्यांच्याकडून झाले. परंतु महाविकास आघाडी सरकार हे भक्कमपणे उभे आहे.

यापुढेही आम्ही महाराष्ट्रातील जनतेची एकत्रिपणे सेवा करत राहू. त्यामुळे भाजपने सरकार पाडण्याच्या भानगडीत पडू नये, असेही राऊत म्हणाले. वीजबील माफी संदर्भात विचारले असता, बील माफी करणे शक्य नाही, त्यासाठी स्वतंत्र तरतूद किंवा केंद्राने अनुदान दिले तरच या संदर्भात काही निर्णय घेणे शक्य आहे, अन्यथा वीजबील भरावेच लागेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा ः ठाकरे सरकारच्या आशिर्वादाने पीक विमा कंपन्यांचं चांगभलं; ४२३४ कोटींचा नफा कमावला..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख