चीनचा झेंडा जाळत भ्याड हल्याचा भाजपकडून निषेध..

चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकत नागरिकांनी देखील चीन विरुध्दच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले. विशेष म्हणेज याच क्रांतीचौकात एमआयएमने देखील सात वाजता चीन विरोधात निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. पण भाजपने दोन तास आधीच धरणे आंदोलन करत एमआयएमवर कुरघोडी केली.
bjp protest against chaina news
bjp protest against chaina news

औरंगाबादः भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी भ्याडपणे केलेल्या हल्यात भारताचे २० जवान शहीद झाले. या हल्याच्या विरोधात भाजपच्या वतीने आज निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली. चीन विरोधात देशात संतापाची लाट आहे, ठिकठिकाणी चीनी वस्तू फोडल्या किंवा जाळून टाकल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने चीनच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले.

पस्तीस वर्षानंतर पुन्हा एकदा चीनने सीमेवर आगळीक करत पेट्रोलींग करणाऱ्या भारतीय जवांनावर खिळे लावलेल्या काठ्यांनी भ्याड हल्ला केला. दोन्ही देशाचे सैनिक यावेळी आमने सामने येऊन झालेल्या हिंसाचारात भारताचे २० जवान शहीद झाले. देश व जगावार कोरोनाच्या संकटाला कारणीभूत ठरलेल्या चीनकडून अशा प्रकारचा हल्ला झाल्यानंतर देशातील जनतेमध्ये संतापाची लाट आहे. या हल्याचा बदला घ्या, अशी मागणी देखील देशवासियांकडून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर चीनचा निषेध करण्यासाठी भाजपने क्रांतीचौक येथे सांयकाळी पाच वाजता धरणे आंदोलन केले. खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत चीन विरोधी घोषणा देत व झेंडा जाळत भाजपने संताप व्यक्त केला.

तसेच चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकत नागरिकांनी देखील चीन विरुध्दच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले. विशेष म्हणेज याच क्रांतीचौकात एमआयएमने देखील सात वाजता चीन विरोधात निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. पण भाजपने दोन तास आधीच धरणे आंदोलन करत एमआयएमवर कुरघोडी केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागत चीनने केलेल्या हल्याचा मुहतोड जवाब देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही, असे स्पष्ट करतांनाच भारताचा एक इंचही भूभाग चीनला देणार नसल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com