भाजप खासदार कराड म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेला गती द्या.. - BJP MP Karad said, speed up the Prime Minister's Housing Scheme .. | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप खासदार कराड म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेला गती द्या..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

पुरी यांनी कराड यांचा मुद्दा खोडून काढला. शिवाय एखाद्या विशिष्ट मुद्यावर तुम्हाला काही म्हणायचे असेल तर निश्चित चर्चा करून त्यावर मार्ग काढू असे आश्वासन देखील पुरी यांनी दिले.

औरंगाबाद ः देशातील पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गोर-गरिबांना घर देण्याची महत्वाकांक्षी योजना केंद्राकडून राबवली जात आहे. मात्र पंतप्रधान आवास योजनेची गती मंदावली आहे, असा घरचा आहेर भाजपचे राज्यसभेतील खासदार डाॅ. भागवत कराड यांनी संसदेत बोलतांना दिला. यावर केंद्रीय राज्यमंत्री हरिदप सिंह पुरी यांनी आश्चर्य व्यक्त केले.

राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर डाॅ. भागवत कराड यांना संसदेत विविध विषय मांडत ते सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या गतीवर प्रश्न उपस्थित करत त्याला वेग देण्याची मागणी सभागृहात केली. यावर राज्यमंत्री हरदिपसिंह पुरी यांनी खासदार कराड यांना देशात पुर्ण झालेली, मंजुर असलेली व नव्याने वाढ करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील घरांची माहिती दिली.

या योजनेचे काम गतीने आणि चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे सांगत पुरी यांनी कराड यांचा मुद्दा खोडून काढला. शिवाय एखाद्या विशिष्ट मुद्यावर तुम्हाला काही म्हणायचे असेल तर निश्चित चर्चा करून त्यावर मार्ग काढू असे आश्वासन देखील पुरी यांनी दिले. देशात एक कोटी पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्याचे उदिष्ठ ठरवण्या आले होते, त्या पैकी चाळीस लाख घरे बांधून लाभार्थ्यांना देण्यात आली आहे. तर वाढीव दहा लाखांच्या घरांसह ७० लाख घरांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून ती देखील लवकरच पुर्ण केली जातील, असेही पुरी यांनी स्पष्ट केले.

औरंगाबादच्या पर्यटनवाढीसाठी प्रयत्न हवेत..

डाॅ. कराड यांनी सभागृहात औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवेचे जाळे निर्माण करण्याची मागणी देखील केली. औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असून इथे जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्या आहेत. या लेण्या पाहण्यासाठी थायलंड, जापान या बुधिस्ट देशातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना थेट औरंगाबादला येता यावे यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा तसेच देशांतर्ग पर्यटन वाढीसाठी व औरंगाबादेत येणाऱ्या व इथून राजस्थान मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी जोधपूर, उदयूर विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी देखील डाॅ. कराड यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख