वाळू प्रश्नावर भाजपच्या दोन पवारांचे विधान भवनाच्या पायऱ्यावर उपोषण

आमदार लक्ष्मण पवार यांनी १९ जानेवारी रोजी गेवराई तहसील कार्यालयसमोर आमरण उपोषण केले होते.
Bjp Two Mla Fast Protest In Front Of Vidhan Bhavan News
Bjp Two Mla Fast Protest In Front Of Vidhan Bhavan News

गेवराई ः मतदारसंघातील वाळू प्रश्नांवर तहसील कार्यालयासमोर उपोषण करून देखील कारवाई झाली नाही, याचा निषेध म्हणून भाजपचे आमदार लक्ष्मण पवार व नायगांवचे राजेश पवार यांनी आज थेट विधान भवनाच्या पायऱ्यावरच उपोषण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वाळूचे टेंडर काढताना अपसेट किंमत कमी करा, जेणेकरून वाळू सामान्य माणसांना माफक दरात मिळेल, वाळूची वाहतूक अवजड वाहनांच्या ऐवजी टॅक्टरच्या सहाय्याने करा तसेच अवैधरित्या अवजड वाहनाने वाळू वाहतूक केल्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन द्या, या व अन्य मागण्यांसाठी आमदार लक्ष्मण पवार यांनी १९ जानेवारी रोजी गेवराई तहसील कार्यालयसमोर आमरण उपोषण केले होते.

या मागणी संदर्भात २७ जानेवारी रोजी अप्पर मुख्य सचिव महसूल व वन विभाग यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वरिष्ठांशी चर्चा करून एका आठवड्यात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यामुळे मंगळवारी लक्ष्मण पवार यांनी विधानभवना समोर उपोषण केले.

गेवराई विधानसभा मतदार संघातील गोदावरी व सिंदफना नदी पात्रातून मागील दोन वर्षांपासून टेंडर न निघाल्यामुळे अवैधरित्या अवजड वाहनाने वाळू उपसा केला जातो. ज्यामुळे शासनाचा महसूल तर बुडतोच, भरधाव वेगाने वाळूची वाहतूक केल्यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका आणि रस्त्यांची देखील दुरावस्था होते.

वाळूचे टेंडर काढताना अपसेट किंमत कमी करा, जेणेकरून वाळू सामान्य माणसांना माफक दरात मिळेल, वाळूची वाहतूक अवजड वाहनांच्या ऐवजी टॅक्टरच्या सहाय्याने करा तसेच अवैधरित्या अवजड वाहनाने वाळू वाहतूक केल्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा अशा मागण्या पवार यांनी केल्या होत्या.

प्रशासनाने मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यामुळे अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी लक्ष्मण पवार यांनी विधान भवनासमोर उपोषण सुरू केले.त्यांच्या सोबत राजेश पवार यांनी सुरु केलेल्या उपोषणाला विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर आमदार नारायण.कुचे यांनीही पाठिंबा दर्शवला.

Edited By :Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com