भाजप आमदार धस यांनी मतदारसंघात उभारले १३ कोरोना सेंटर..

कोरोना संकटाच्या काळात धस विश्वस्त असलेल्या मच्छिंद्रनाथ देवस्थान व आष्टी तालुका दुध संघातर्फे आरोग्य विभागाच्या सहकार्यानेमतदार संघात तब्बल १३ कोविड सेंटर उभारले आहेत.
Bjp Mla Suresh Dhas News Ashti-Beed
Bjp Mla Suresh Dhas News Ashti-Beed

बीड : अडचणीत सापडलेल्या सामान्यांच्या मदतीसाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारे भाजप आमदार सुरेश धस आता मतदार संघातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धाऊन आले आहेत. (BJP MLA Dhas has set up 13 Corona Centers in the constituency.) धस विश्वस्त असलेल्या मच्छिंद्रनाथ देवस्थान व आष्टी तालुका दुध संघाच्या मदतीने त्यांनी आष्टी - पाटोदा -शिरुर कासार या तीन तालुक्यांत तब्बल
१३ कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना केंद्र सुरू करणारे ते बहुदा राज्यातील एकमेव आमदार असावेत, असे बोलले जाते.

मागच्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि ऊसतोड मजूरांना जिल्ह्यात येण्याचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्यांच्या मदतीला धाऊन जाताना धस यांनी स्वत:वर गुन्हे दाखल झाले तरी पर्वा केली नाही. जिल्ह्यातील पहिला रुग्ण आष्टी तालुक्यात आढळल्यानंतर भितीचे वातावरण निर्माण झाले.(He went out to allay the fears of the people even though the village was a containment zone.) परंतु, गाव कंटेनमेंट झोन असतानाही लोकांची भिती दुर करायला ते बाहेर पडले. तेव्हा देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दुसरी लाट सुरु झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर व्यापाऱ्यांसाठी सविनय कायदेभंगाची आक्रमक भूमिकाही धस यांनी घेतली होती. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आणि सगळ्यांची धावाधाव सुरु झाली. आष्टीच्या रुग्णांना  नगर जवळ किंवा जिल्हा रुग्णालयात यायचे म्हटले तर शंभर किलोमिटरहून अधिक अंतर पार करावे लागायचे. रुग्णांचे हाल पाहून पुन्हा धस कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावले.

हजार रुग्णांवर उपचार.

मच्छिंद्रनाथ देवस्थान व आष्टी तालुका दुध संघाच्या माध्यमातून आष्टी मतदार संघातील आष्टी, शिरुर कासार व पाटोदा तालुक्यात  त्यांनी आतापर्यंत १३ कोविड केअर सेंटरची उभारणी केली. काही कोविड केअर सेंटरच्या खाटांची क्षमता ५० तर काही कोविड केअर सेंटरची क्षमता १०० खाटांची आहे. (Thousands of patients have been treated free of cost.) यामुळे साधारण हजारांवर रुग्णांच्या उपचाराची मोफत सोय झाली आहे. त्यांना तज्ज्ञ डॉक्टर आणि मनुष्यबळासाठी आरोग्य विभागानेही मदत केली आहे.

दरम्यान, या सर्व कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना नियमित योगासने, अंडी, मोड आलेले कडधान्याच्या नाष्टा आणि चांगले जेवणही दिले जाते. (Suresh Dhas at Kovid Care Center is the personal focus of Chiranjeev Jaydutt Dhas.) आष्टी तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा, लोणी सय्यदमीर, टाकळसिंग, धामणगाव, सावरगाव, पारगाव तसेच पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा, अंमळनेर, डोंगरकिन्ही, नायगाव तसेच शिरुर कासार येथील कोविड केअर सेंटरवर सुरेश धस त्यांचे चिरंजीव जयदत्त धस यांचे वैयक्तिक लक्ष  असते. 

कोरोनाग्रस्तांना खंबीर साथ..

वेळोवेळी भेटी देऊन हे दोघेही रुग्णांची विचारपूस करत असतात. या कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत शेकडो रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गावांच्या जवळ कोविड केअर सेंटर असल्याने त्यांची आर्थिक अडचणही दूर झाली आहे. मधल्या काळात आष्टी तालुक्यात रेमडेसिव्हीर उपलब्धतेत अडचणी येत असल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच संताप व्यक्त केला होता. या शिवाय आष्टीतील जे रुग्ण  नगरला उपचार घेत आहेत, त्यांच्या मदतीलाही धस तत्परतेने धावून गेल्याचे दिसून आले. 

कोरोनाग्रस्त गावांत आणि कुटूंबियांना धीर देण्यासाठी गेल्यानंतर ‘परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार रहा मी तुमच्या बरोबर आहे’ असा धीरही धस देतात. अँटीजन टेस्ट मोहिमेसाठी मतदार संघाचा दौरा करत हातात भोंगा घेऊन लोकांनी एका ठिकाणी एकत्र न येता दूरवर राहून सूचना देत कोरोना संकटात त्यांनी जनजागृतीचे कामही केले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com