भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण

एक तासापुर्वी अभिमन्यू पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून ही माहिती दिली. मला हलकासा ताप, खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबियानी कोरोनाची चाचणी केली. त्यात मी व माझा मुलगा परिक्षितचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्‍यानूसार आम्ही उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत.
mla abhimanyu pawar corona news
mla abhimanyu pawar corona news

लातूर : भाजपचे आमदार अभिमन्यू पवार व त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी स्वतःच ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली. हलकासा ताप आणि खोकला जाणवू लागल्याने आपण कुटुंबियाची कोरोना चाचणी करून घेतली. त्यात मुलगा आणि माझी टेस्ट पॉझीटीव्ह आल्याचे त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले. त्यांच्यावर लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे येथील डॉक्टरांनी जाहिर केले.

कोरोनाचा फैलाव रोखता यावा म्हणून जनतेत सहभागी होणाऱ्या पोलीस अधिकारी, डॉक्टर यांच्या पाठोपाठ आता राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याआधी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय, भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ आता लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या नावाचीही भर पडली आहे.

एक तासापुर्वी अभिमन्यू पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून ही माहिती दिली. मला हलकासा ताप, खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबियानी कोरोनाची चाचणी केली. त्यात मी व माझा मुलगा परिक्षितचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्‍यानूसार आम्ही उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत.

लातूर मधील आरोग्य सेवेवर माझा विश्वास आहे, त्यामुळे लातूरातच उपचार घेण्याचा निर्णय घेतला असून माझ्या व परिक्षितच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घ्यावे, तसेच कोरोना चाचणी देखील करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी ट्वीवट्च्या माध्यमातून केले आहे. शिवाय काही काम असल्यास मला मेसेज करावा, आमची दोघांची तब्यत बरी आहे, काळजी करू नये, तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आम्ही लवकरच बरे होऊ, आपणही आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, असे आवाहनही अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत लातूर शहर आणि जिल्ह्यातील 220 व्यक्तींचे स्वॅब आज (ता. 7) तपासणीसाठी आले होते. यापैकी तब्बल 159 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 20 जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत तर 1 अहवाल रद्द करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेले लातूरमधील 21, उदगीरमधील 3, अहमदपूरमधील 5, निलंगा येथील 2, औसा येथील 8, कासारशिरसीतील 1 असे रुग्ण आहेत. यात आमदार, त्यांचा मुलगा आणि भाचा यांचा समावेश आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com