पंकजांच्या त्या एका कृतीने भाजपच्या नेत्यांना हायसे वाटले! - BJP leaders were happy with that one action of Pankaja Munde! jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पंकजांच्या त्या एका कृतीने भाजपच्या नेत्यांना हायसे वाटले!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

त्या सगळ्या ठिकाणी पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है, या घोषणांचा अक्षरशः पाऊस पडायचा.

औरंगाबाद ः आपलाच नेता कसा मोठा आहे, इतरांपेक्षा उजवा आहे हे दाखवण्यासाठी समर्थकांकडून .. अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणा दिल्या जातात. नेत्यांना देखील त्या हव्या हव्याश्या असतात. पण कधी कधी समर्थकांचा हाच अतिउत्साह त्या पक्षाती नेत्यासाठी डोकेदुखी ठरतो. (BJP leaders were happy with that one action of Pankaja Munde!) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या गोपीनाथ गडावरून सुरू करण्यात आलेल्या जनआशिर्वाद यात्रेतील अशाच घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्यासाठी तापदायक ठरल्या आहेत.

अंगार है, भंगार है या काय घोषणा आहेत का? आपल्यावर हेच संस्कार झाले आहेत का? अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची लायकी काढली. (Bjp Leader Pakaja Munde) विशेष म्हणजे भाजपच्या राज्य व दिल्लीतील नेतृत्वाकडून पंकजा व प्रितम मुंडे या बहिणीवर अन्याय होत आहे, अशी त्यांच्या समर्थकांमध्ये भावना  असतांना पंकजा यांनी गोपीनाथ गडावर घेतलेली आजची ही भूमिका पक्षातील अन्य नेत्यांना मात्र सुखद धक्का देणारी ठरली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रम, कार्यकर्त्यांचे मेळावे, सभा घेतल्या, त्या सगळ्या ठिकाणी पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है, या घोषणांचा अक्षरशः पाऊस पडायचा. (Central State Minister Dr.Bhagwat Karad) विरोधी पक्षांतील नेत्यांना उद्देशून या घोषणा दिल्या जात असतील तर त्यात काही वावगे नाही. पण भाजपमधील वरिष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष ज्या व्यासपीठावर उपस्थित होते, तेव्हा देखील अशा घोषणा दिल्या गेल्या. विशेष म्हणजे तेव्हा पंकजा मुंडे यांनी कधी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा त्याबद्दल खंत देखील व्यक्त केली नाही.

मग आज असे काय घडले? की त्यांनी आपल्याच समर्थकांना झापले,  एवढेच नाही तर त्यांची लायकी काढत त्यांना माझ्यासमोर येऊ नका, असे खडेबोलही सुनावले. पंकजा मुंडे यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील इतर नेत्यांनी मात्र सुकेचा निश्वास सोडला असेल एवढे मात्र निश्चित. पंकजा मुंडे या आक्रमक नेत्या म्हणून राज्यात ओळखल्या जातात. त्यामुळे पक्षाकडून अन्याय झाला की त्या रोखठोक भूमिका घेतात, अर्थात त्यांच्या पाठीशी समर्थकांची असलेली ताकद त्याला कारणीभूत आहे.

परळीतील पराभव, विधान परिषदेत डावलणे, राज्यसभेवर पक्षातीलच ज्युनिअर पदाधिकाऱ्याला संधी देणे, मग मंत्रीपदाची अपेक्षा असतांना पुन्हा तोच प्रकार घडणे यामुळे पंकजा मुंडे पक्षावर नाराज होत्या. आधी रमेशअप्पा कराड आणि आता केंद्रात मंत्रीपदाची संधी डाॅ. भागवत कराड यांना मिळाल्यामुळे सहाजिकच मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड रोष होता. परळीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी जेव्हा पहिल्यांदा गोपीनाथ गडावर तेव्हा भाजपमध्ये असलेले ओबोसी नेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाषण केले, तेव्हा देखील पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणांनी गड दणाणून गेला होता.

अशा घोषणा ठरत आहेत डोकेदुखी..

पण तेव्हा पंकजा यांनी समर्थकांना रोखले नव्हते हे या निमित्ताने सांगावे लागेल. परंतु दरम्यानच्या काळात पुलाखालून खूप पाणी गेले, राजीनामानाट्यही फसले. ज्या भागवत कराड यांना पंकजा समर्थकांनी जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, अशी भाषा केली, त्याच पंकजा मुंडे यांच्या परळीतून त्यांच्या जनआशिर्वाद यात्रेला सुरूवात झाली. गोपीनाथ गडावर जाऊन कराड यांनी आपले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे आशिर्वाद घेतले. या यात्रेला भाजपचा झेंडा दाखवण्याची जबाबदारी दिल्लीतील नेत्यांनी पंकजा यांच्यावर सोपवली, त्यांच्याच उपस्थितीत हे घोषणा नाट्य घडले.

अशा प्रकारांनी आपली बदनामी होते, हे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना ओरडून सांगणे यातच सगळं काही आलं.  एकंदरित बाकी सब भंगार है, या घोषणेमुळे सुखावणाऱ्या नेत्यांनीच आता यावर नाराजी व्यक्त करत अशा भंगार घोषणा देऊ नका, असे आदेश दिल्यामुळे भाजपमधील इतर नेत्यांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला असणार एवढे मात्र निश्चित. 

हे ही वाचा ः पोलिस दबावाखाली गुन्हे दाखल करत आहेत, पण मी घाबरणार नाही..

Edited By : Jagdish pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख