डीवायएसपी खिरडकरांसह सात-आठ पोलिसांकडून भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल..

खिरडकर यांनी अपशब्द वापरत गवळी समाजाबद्दल आक्षेपाहार्य भाषा वापरली होती. तेव्हा हा सगळा प्रकार सदर भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याने मोबाईलमध्ये कैद केला होता.
Dysp Kiradkar-Beate Bjp Acitvist News Jalna
Dysp Kiradkar-Beate Bjp Acitvist News Jalna

जालना : एका भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (BJP activitts bearer beaten to death by seven-eight policemen including DYSP Khiradkar, video goes viral.) विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात दोन लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात अडकलेले जालन्याचे डीवायएसपी सुधीर खिरडकर व त्यांच्यासह अन्य सात-आठ पोलिस कर्मचारी या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहेत.

जालन्यातील भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवराज नारीयालवाले यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (It is seen that Sudhir Khiradkar used offensive words about Gawli community.) हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असून यात तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी गवळी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे दिसून येत आहे. नारीयालवाले यानेच हा वादग्रस्त व्हिडिओ केल्याचा रागातून ही मारहाण झाल्याचे देखील बोलले जाते. 

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर,कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. (Khiradkar was caught red-handed by the Anti-Corruption Bureau a few days ago while accepting a bribe of Rs 2 lakh.) दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना काही दिवसांपूर्वी दोन लाखांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले होते.

या कारवाईनंतर खिरडकर यांनी गवळी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आल्याची देखील चर्चा आहे.खिरडकर यांच्यासह मारहाण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गवळी समाजाकडून आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनांद्वारे केली जाणार आहे.

नेमके प्रकरण काय? 

हे संपुर्ण प्रकरण नेमके काय आहे, भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्याला एवढी बेदम मारहाण का झाली? याची माहिती घेतली असता काही दिवसांपुर्वी जालना येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. डाॅक्टरांनी योग्य उपचार केले नाही, असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत तिथे गोंधळ घातला होता.

दर्शन हिरालाल देवावाले या ३० वर्षीय तरुणाचा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत खरपुडी परिसरात अपघात झाला होता. त्याला गंभीर अवस्थेत शहरातील दीपक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पंरतु अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला, त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत आयसीयू आणि शेजारी असलेल्या कोविड विभागाची तोडफोड करत काचा फोडल्या होत्या. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसानी बाळाचा वापर करत सात ते आठ नातेवाईकांना ताब्यात घेत हाॅस्पीटल प्रशासनाच्या तक्रीरीवरून गुन्हा दाखल केला. दरम्यान हाॅस्पीटलमध्ये तोडफोड करणाऱ्या तरुण व नातेवाईकांना उद्देशून खिरडकर यांनी अपशब्द वापरत गवळी समाजाबद्दल आक्षेपाहार्य भाषा वापरली होती. तेव्हा हा सगळा प्रकार सदर भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याने मोबाईलमध्ये कैद केला होता.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याच्या रागातून खिरडकर व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे बोलले जाते. या व्हिडिओनंतर खिरडकर यांच्या विरोधात अनेक वकील, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी या पोलिस अधिकाऱ्यावर कायम स्वरूपी निलंबनाची कारवाई करावी,अशी मागणी करत आहेत. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com