भुमरे म्हणतात, मी खरेदी केलेला प्लाॅट काय मलबार हिलचा आहे का? किंमत ऐकून डोकं चक्रावलं..

पैठण बसस्थानकाजवळ असलेल्या या प्लाॅटवर म्हणे घरकुलाची योजना होती, यात देखील तथ्य नाही. विरोधकांच्या अशा आरोपांना बळी पडू नका.
Shivsena Minsiter Sanipan Bhumre News Paithan, Aurangabad
Shivsena Minsiter Sanipan Bhumre News Paithan, Aurangabad

औरंगाबाद ः विरोधकांकडे माझ्याविरोधात बोलायाला काहीच शिल्लंक नाही, तालुक्यात आणि मंत्री म्हणून मी करत असलेली विकास कामे त्यांना खूपत असल्यामुळेच माझ्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. पैठणमध्ये मी ३० कोटींचा सरकारी प्लाॅट बळकावल्याचा आरोप ऐकून तर माझे डोकेच चक्रावले. (Bhumare says, is the plot I bought from Malabar Hill? Hearing the price made my head spin) साडेपाच हजार स्केवअर फूटच्या प्लाॅटची किमंत ३० कोटी कशी असेल, तो काय मलबार हिलचा प्लाॅट आहे का? असा सवाल करत रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.

१९ वर्षापुर्वी मी तो प्लाॅट खरेदी केला आहे, ज्या व्यक्तीकडून घेतला त्याला पैसे दिले, तो म्हणत नाही मी प्लाट बळकावला, पण विरोधकांना काही काम उरले नाही, म्हणून त्यांच्याकडून असे खोटे आरोप माझ्यावर केले जात असल्याचे भुमरे यांनी सांगितले. (Shivsena Minsiter Sanipan Bhumre) राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांनी गेल्या आठवड्यात संदीपान भुमरे व त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे यांच्यावर पैठणमधील सरकारी भुखंड हडप केल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता.

या आरोपाला संदीपान भुमरे यांनी आज प्रथमच जाहीर कार्यक्रमात उत्तर दिले. संदीपान भुमरे म्हणाले, मी मंत्री झाल्यापासून विरोधकांकडून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आता मी पैठणमधला सरकारी भूखंड तोही ३० कोटीचा बळकावल्याचा नवा आरोप केला आहे. साडेपाच हजार स्क्वेअर फुटाचा पैठणमधील प्लाॅट ३० कोटींचा कसा झाला हेच मला कळत नाही?

मी हिशोब लावला तर तो ५८ हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढा जातो. तर पाच कोटी रुपये गुंठा. तेव्हा मला प्रश्न पडतो हा प्लाॅट पैठणमधला आहे का मुंबईच्या मलबारहिलचा. विरोधकांना काही काम उरले नाही म्हणून ते माझ्यावर असे आरोप करत आहेत. पण या विरोधकांना मी भविष्यात देखील काहीच काम उरू देणार नाही, असे सांगत भुमरे यांनी भूखंड बळकावल्याचे आरोप फेटाळून लावले.

हा प्लाॅट १९ वर्षापुर्वी मी पैसे देऊन खरेदी केला होता. ज्याच्याकडून खरेदी केला त्याने कधी मी तो बळकावला किंवा चेक देऊन त्याची फसवणूक केली असे कधी म्हटले नाही. मला प्लाॅट खरेदी करण्याचा अधिकार नाही का? अनेक खाजगी लोक प्लाॅट खरेदी करतात, मग मी केला तर काय बिघडले? असेही भुमरे यांनी स्पष्ट केले.

मी प्लाॅट खरेदी करू शकत नाही का?

पैठण बसस्थानकाजवळ असलेल्या या प्लाॅटवर म्हणे घरकुलाची योजना होती, यात देखील तथ्य नाही. विरोधकांच्या अशा आरोपांना बळी पडू नका, असे आवाहन देखील भुमरे यांनी केले.

शेत रस्ते खाल्ले, कोरोना काळात गावात गेले अशा अनेक बातम्या आणि आरोप माझ्यावर विरोधकांकडून सुरू आहेत. पण मी राज्याच्या मंत्री आहे, तेव्हा मी तालुक्यासाठी काही केले नाही, विकासकामे, निधी आणला नाही,  असे कुठेलेच त्यांच्याकडे शिल्लक नसल्याने विरोधकांचे हे उद्योग चालू आहेत. पण मी याकडे फार गांभीर्याने पाहत नाही.

माझ्या मंत्रीपदाचा फायदा तालुक्याला आणि मतदारसंघातील जनतेला कसा होईल, याकडेच माझे लक्ष आहे. २८५ कोटी रुपयांची वाॅटरग्रीड योजना पैठणमधून सुरू होणार असल्याने आता प्रत्येक गावातील माणसाला दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणी मिळणार असल्याचेही भुमरे  यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com