बीड जिल्हा बॅंकेचा वाद राज्यपालांच्या दारात

हा विषय सहकारमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निकाली लागू शकतो, मात्र सहकारमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत का असा प्रश्न निर्माण भाजपकडून उपस्थित केला जातोय.
Beed District Bank- Pankaja Munde- Gavornaer Letter News
Beed District Bank- Pankaja Munde- Gavornaer Letter News

मुंबई ः बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. पालकमंत्र्यांकडून ही निवडणूक होऊच नये, प्रशासक नेमला जावा, असे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी आज जिल्ह्यातील आमदारांसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

बीड जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे हे विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवून निवडणूकच होऊ नये आणि बॅंकेवर प्रशासक नेमला जावा, असे प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर आज पंकजा मुंडे, आमदार लक्ष्मण पवार, सुरेश धस, नमिता मुंदडा यांनी राज्यपालांची भेट घेऊन हा सगळा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी राज्यातील इतर प्रश्नांवर देखील राज्यपालांशी चर्चा झाल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

बीड जिल्हा बँकेची निवडणूक होणार होती त्यासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते ते अपात्र ठरवण्यात आलेत. पालकमंत्र्यकडून ही निवडणूक होऊ दिली जात नाहीये त्यावर प्रशासक नेमण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा विषय सहकारमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निकाली लागू शकतो, मात्र सहकारमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत का असा प्रश्न निर्माण भाजपकडून उपस्थित केला जातोय. राज्यपालांच्या भेटीत यासह इतर विषयांवर चर्चा झाली.

राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होतायेत. जळगावची घटना अतिशय निंदनीय आहे. मात्र त्यात काही अधिकारीच सहभागी असल्याचे समोर आल्यामुळे सर्वात आधी अशा अधिकाऱ्यांचे निलंबन झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दसरा मेळाव्याला जी गर्दी झाली त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र त्यानंतर कितीतरी मोठे राजकीय कार्यक्रम झाले त्यांच्या बाबतीत वेगवेगळा न्याय देण्यात आला. गर्दी होऊ नये यासाठी मी लोकांना आवाहन केलं होतं मात्र गर्दी झाली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी देखील जिल्ह्यातील आमदारांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केल्याचे पंकजा मुंडे यांनी कळवले आहे.

पंकजा मुंडे यांच्यावर दसरा मेळाव्याला गर्दी जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यावेळी त्यांनी लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही लोक आले.  संजय राठोड यांनीही परवा पोहरदेवीला गर्दी केली. नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की मी लोकांना बोलावलेलं नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल न होता इतर काही लोकांवर तो दाखल झाला, मात्र पंकजा मुंडेनी या संदर्भात स्पष्टीकरण देऊन सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला, याकडे आमदार लक्ष्मण पवार यांनी लक्ष वेधले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com