भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण करणे अंगलट; पोलिस उपनिरीक्षकासह, तीन कर्मचारी, होमगार्ड निलंबित..

डीवायएसपी सुधीर खिरडकर व त्यांच्यासह अन्य सात-आठ पोलिस कर्मचाऱ्यांनी भाजप पदाधिकारी शिवराज नारियलवाले याला बेदम मारहाण केली होती.
Bjp  Activites Beatean By Police News Jalna
Bjp Activites Beatean By Police News Jalna

जालना : महिनाभरापुर्वी जालन्यातील एका खाजगी हाॅस्पीटलमध्ये रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. यावेळी पोलीसांनी तिथे धाव घेत गोंधळ घालणाऱ्यांना मारहाण करत गवळी समाजाबद्दल अपशब्द वापरले होते.

हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करणाऱ्या भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस शिवराज नारियलवाले याला डीवायएसपी, पोलिस निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर नुकताच व्हायरल झाला होता. (beating BJP office bearer; Three employees, including police inspector, homeguard suspended.)

चोहोबाजूंनी पोलिसांवर टिकेची झोड आणि कारवाईची मागणी झाल्यानंतर अखेर आज या प्रकरणी पोलिस अधिक्षकांनी पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमीत सोळंके या तीघांसह महेंद्र भारसाखळे होमगार्ड यांना निलंबित केले आहे.

जालन्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याला सात ते आठ पोलिस कर्मचारी लाठ्या-काठ्या आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. (BJP activitts bearer beaten to death by seven-eight policemen including DYSP Khiradkar, video goes viral.) दोन लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात अडकलेले जालन्याचे डीवायएसपी सुधीर खिरडकर व त्यांच्यासह अन्य सात-आठ पोलिस कर्मचाऱ्यांनी भाजप पदाधिकारी शिवराज नारियलवाले याला बेदम मारहाण केली होती. 

या घटनेचे तीव्र पडसाद काल उमटले. अनेक भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध करतांनाच संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई करावी,  अशी मागणी लावून धरली होती. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह अनेकांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत या विरोधात निदर्शने देखील केली होती.

माजी मुख्यमत्री तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही? असा सवाल करत मुख्य्मंत्र्यांनी या प्रकणात लक्ष घालून संबंधितावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यानंतर  काही वेळानेच गृहविभागाने या प्रकरणात पोलिस निरीक्षकासह, तीन कर्मचारी व एका होमगार्डला निलंबित केल्याचे जाहिर केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर,कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसून आले होते. (Khiradkar was caught red-handed by the Anti-Corruption Bureau a few days ago while accepting a bribe of Rs 2 lakh.) 

असे आहे प्रकरण..

९ एप्रिल रोजी जालना येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. डाॅक्टरांनी योग्य उपचार केले नाही, असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत तिथे गोंधळ घातला होता.दर्शन हिरालाल देवावाले या ३० वर्षीय तरुणाचा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत खरपुडी परिसरात अपघात झाला होता. त्याला गंभीर अवस्थेत शहरातील दीपक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

पंरतु अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला, त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत आयसीयू आणि शेजारी असलेल्या कोविड विभागाची तोडफोड करत काचा फोडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसानी बाळाचा वापर करत सात ते आठ नातेवाईकांना ताब्यात घेत हाॅस्पीटल प्रशासनाच्या तक्रीरीवरून गुन्हा दाखल केला.

दरम्यान हाॅस्पीटलमध्ये तोडफोड करणाऱ्या तरुण व नातेवाईकांना उद्देशून खिरडकर यांनी अपशब्द वापरत गवळी समाजाबद्दल आक्षेपाहार्य भाषा वापरली होती. तेव्हा हा सगळा प्रकार सदर भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याने मोबाईलमध्ये कैद केला होता.हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याच्या रागातून खिरडकर व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे बोलले जाते. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com