पोलिसांच्या हाती दंडुक्या ऐवजी बॅट अन् चेंडू ...

आपल्यातील कलागुणांचा पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात चांगलाच वापर जनजागृतीसाठी केला. गाण्याच्या माध्यमातून कोरोना संसर्ग कसा रोखावा याचे प्रबोधन करतांनाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर आपण पाहिले.शहराच्या रस्त्यावर सहकाऱ्याने वेगात टाकलेला चेंडू उंच टोलावतांनाचे चित्र या निमित्ताने आज पहायला मिळाले. काहीवेळाचा विरंगुळा म्हणून पोलिस कर्मचाऱ्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला.
police play cricket on road news
police play cricket on road news

औरंगाबादः कोरोनाचे वाढते संकट आणि गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाऊनमुळे आॅन ड्युटी चोवीस तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आज वेगळेच रुप पहायला मिळाले. थोड्यावेळासाठी हातातील दांडुका बाजुला ठेवून पोलिसांनी चक्क बॅट आणि चेंडू घेत क्रिकेटचा आनंद लुटला. शहरात सध्या कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी देखील पोलिस प्रशासनाला सहकार्य करत संचारबंदीचे काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे पोलिसांवरील ताण काहीसा हलका झाला, आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी आज क्रिकेट खेळत काहीसा शीण घालवला.

खाकी वर्दी म्हटलं की सामान्यांच्या मनात एक वेगळे चित्र निर्माण होते. पण वेळ, काळ, प्रसंग पाहून कधीतरी पोलिसांना कठोर व्हावे लागते. कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता अबाधित राखण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. पण पोलिसांमध्ये देखील माणुसकी आणि सह्दय माणूस लपलेला असतो याची प्रचिती अनेकदा आलेली आहे.

दंगल असो की नैसर्गीक आपत्ती पोलिस सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातातच. कोरोनाच्या जागतिक संकटात तर राज्यातील पोलिसांवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. कायदा व सुव्यवस्था राखतांनाच स्वतःचा आणि कुटुंबाचा कोरोनाच्या संसर्गापासून त्यांना बचाव करावा लागत आहे.

गेल्या साडेतीन महिन्यांपासून पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता बंदोबस्तावर तैनात आहेत. वेळेवर जेवण नाही, कामाचा अतिरिक्त ताण आणि कुटुंबियांपासून वेगळे राहावे लागत असल्याने साहजिकच त्यांच्यावर मानसिक ताण येतो. पण अशा परिस्थितीतही ते जिल्ह्याच्या नाक्यांवर, शहराच्या मुख्य रस्ते आणि चौकात आपले कर्तव्य चोख बजावतांना दिसत आहेत.

औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शहरात १० ते १८ जुलै दरम्यान कठोर लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज लॉकडाऊनचा पाचवा दिवस असून लोकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करत प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्यच्या कामात महत्वाची भूमिका बजावली आहे. अर्थात पोलिसांचे देखील यात मोठे योगदान आहे.

विरंगुळा म्हणून..

शहरातील शहागंज या मध्यवस्तीच्या भागात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करणे, वाहनांची तपासणी मोहिम सध्या पोलिसांकडून राबवली जात आहे. संचारबंदीला लोकांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांना थोडीशी उसंत मिळाली. त्यामुळे त्यांनी खुर्चीचा स्टंप, बॅट आणि चेंडूची व्यवस्था करत जोरदार फटकेबाजी केली. पोलिसांमध्ये चांगले खेळाडू, गायक, कलाकार असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

या आपल्यातील कलागुणांचा पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात चांगलाच वापर जनजागृतीसाठी केला. गाण्याच्या माध्यमातून कोरोना संसर्ग कसा रोखावा याचे प्रबोधन करतांनाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर आपण पाहिले.शहराच्या रस्त्यावर सहकाऱ्याने वेगात टाकलेला चेंडू उंच टोलावतांनाचे चित्र या निमित्ताने आज पहायला मिळाले. काहीवेळाचा विरंगुळा म्हणून पोलिस कर्मचाऱ्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला, पण नंतर पुन्हा ते आपल्या बंदोबस्ताच्या कामाला लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com