नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बसवराज पाटील सक्रीय; काॅंग्रेस कार्यकर्ते जोमात

पराभव जिव्हारी लागल्यानेपाटील यांनी औशाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात होते. काॅंग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या औशातील पराभवानेकाँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखीलकमालीची मरगळ आली होती.
Ex. Mla Basvraj Patil-Congress Latur-Ausa News
Ex. Mla Basvraj Patil-Congress Latur-Ausa News

औसा :गत विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माजी आमदार बसवराज पाटील यांनी औसा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याच्या आणि ते पुन्हा औशात येणार नसल्याच्या वावड्या उठत होत्या. त्या सर्व  चर्चांना आता पुर्णविराम मिळाला असून बसवराज पाटील गेल्या महिन्याभरापासून औसा मतदारसंघात पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. औसा नगरपालिका निवडणूक तोंडावर असतांना बसवराज पाटीलांनी मतदारसंघात लक्ष घातल्याने काॅंग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.

दहा वर्ष म्हणजेच दोन टर्म २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बसवराज पाटलांनी औसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी औशाची वेगळी ओळख जिल्ह्यात व महाराष्ट्रात निर्माण केली. ते विजयाची हॅट्रिक साधतील असा विश्वास असतांनाच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचे अभिमन्यू पवार यांच्याकडून हार पत्करावी लागली.

पराभव जिव्हारी लागल्याने पाटील यांनी औशाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात होते. काॅंग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या औशातील पराभवाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील कमालीची मरगळ आली होती. अनेकांनी बसवराज पाटलांना पुन्हा सक्रिय होण्यासाठी साकडे देखील घातले. मात्र यावर केवळ स्मितहास्य करत पाटील हा विषय टाळत होते.

कधी ते उमरगा तर कधी तुळजापूर येथून आगामी निवडणूक लढविणार असल्याच्या बातम्या कानावर यायच्या. मध्यंतरी त्यांनी कोरोनामुळे स्वतःला सर्वांपासून दूरच ठेवले. भांभावलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मग लातूरच्या गढीचा आधार घेत काम चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. बसवराज पाटलांच्या पराभवाची अनेक कारणे जरी असली तरी गेल्या पाच वर्षात त्यांची मतदारसंघातील मतदारावरची ढिली झालेली पकड घरभेदींचा कोंडाळा तेव्हढाच महत्वाचा मानला जातो.

कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा आणि लोकांच्या अपेक्षा यामुळे अखेर बसववराज पाटलांनी  गेल्या महिन्यापासून मतदारसंघाती विविध कार्यक्रमांना हजेरी लावणे सुरू केले आहे. नेते सक्रीय झाल्याचे पाहून  काँग्रेस कार्यकर्तेही जोमात आले आहे. औसा नगरपालिकेची निवडणूक तोंडावर असतांना झालेला हा बदल काॅंग्रेससाठी बुस्टर डोस ठरू शकतो. 

पालिकेची बिघडलेली घडी बसविण्या बरोबरच गेल्या निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करण्याचीही त्यांना उत्तम संधी असल्याचे बोलले जाते. मतदारसंघातील लोकांबरोबरच त्यांचा वाढत असलेला संवाद आणि संपर्क हा निश्चित काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरणार आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com