बॅंक खाते जप्त झालेले नाही, हा तर राजकीय खोडसाळपणा; संचालकांचा दावा. - The bank account has not been confiscated, it is a political ploy; Director's claim. | Politics Marathi News - Sarkarnama

बॅंक खाते जप्त झालेले नाही, हा तर राजकीय खोडसाळपणा; संचालकांचा दावा.

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे.

परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचा दावा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. एस. दीक्षितूलू यांनी म्हटले आहे. (The bank account has not been confiscated, it is a political ploy; Director's claim.)

दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं  हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. ((Bank account of Vaidyanath factory headed by Pankaja Munde seized )

कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही, असे दीक्षितूलू यांनी स्पष्ट केले आहे. ((Bjp Leader Pankaja Munde, Beed) हा दावा करतांना कार्यकारी संचालकांनी भविष्य निर्वाह निधी सहायक आयुक्तांनी केलेल्या कारवाई संदर्भात मात्र काहीच उल्लेख केलेला नाही.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी येथील पांगरीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बॅंक खाते जप्त करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागीय कार्यालयातर्फे हे खाते जप्त करण्यात आले. दोन वर्ष कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा तब्बल १ कोटी ४६ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्यामुळे ही करवाई करण्यात आली.

पैकी कारखान्याच्या जप्त करण्यात आलेल्या बॅंक खात्यातून ९२ लाखांची वसुली करण्यात आली आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत सापडला आहे. 

हे ही वाचा ः अजिंठा लेणी विकासासाठी आराखडा करण्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचे आश्वासन..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख