बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन,स्मारकाच्या कामाला गती द्या..

प्रियदर्शनी उद्यान एमजीएम परिसरात भव्य असे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा शहरात आले होते, तेव्हा आवर्जून त्यांनी या नियोजीत स्मारकाच्या जागेची पाहणी करून आराखड्यात काही बदल सुचवले होते.
subhash desai and balasaheb thackeray news
subhash desai and balasaheb thackeray news

औरंगाबादः शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रियदर्शनी उद्यानातील स्मारक व स्मृतीवनाच्या कामाला गती द्या, यात असलेल्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मुख्यमंत्री शहरी सडक योजनेअंतर्गत एमएसआरडीसीच्या स्वनिधीतून रस्त्याची कामे या महिन्याच्या अखेरीस पुर्ण होणार असल्याची माहिती देखील देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महापालिका आढावा बैठकीत दिली.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महापालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यावर भर दिला.  प्रियदर्शनी उद्यान एमजीएम परिसरात भव्य असे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा शहरात आले होते, तेव्हा आवर्जून त्यांनी या नियोजीत स्मारकाच्या जागेची पाहणी करून आराखड्यात काही बदल सुचवले होते. 

त्यामुळे शहरातील बाळासाहेबांचे हे स्मारक व स्मृतीवन शिवसेनेच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आढावा बैठकीत प्रामुख्याने सुभाष देसाई यांनी यावर चर्चा करून सद्यस्थिती जाणून घेतली. एवढेच नाही तर स्मारकाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर करून, तातडीने कामाला गती द्या, असे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले.

महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी  शहरातील विविध कामांसंदर्भात बैठकी माहिती दिली. शहरातील स्मार्ट सिटी बस योजना यशस्वी झाली असून प्रत्येक वर्षी शंभर याप्रमाणे पुढील पाच वर्षात  पाचशे बसचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाज्यांची दुरूस्ती लवकरच करण्यात येणार असून शहरातील तीन पुलांच्या कामाकरीता डीपीडीसीतून मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या शिवाय पॅनसिटी अंतर्गत मनपाच्या शाळा, दवाखाने, कार्यालय ई-गव्हर्नस प्रकल्पात घेण्यात येणार आहेत. मास्टर सिस्टीम ईन्टफ्रीग्रेटर अंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविणे, पोलीस संरक्षण, बायोमॅट्रीक प्रणालीचा समावेश असून मनपाच्या सर्व कार्यालयात इंटरनेटसाठी फायबर ऑप्टीकल्स टाकण्यात येणार आहेत.

सफारीपार्कमधून १० ते १५ कोटी मिळणार

सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालया संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे मिटमिटा येथे शंभर एकर जागा उपलब्ध करण्यात आली असून येथेच प्राणीसंग्रहालय उभारण्यात येऊन पुढील टप्यात सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागेकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगतानाच या प्रकल्पातून महानगरपालिकेला १० ते १५ कोटींचे वार्षीक उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

शहरात दोन ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्राव्दारे कचऱ्यावर प्रक्रिया करणे चालू असून लवकरच हर्सुल येथील प्रक्रिया केंद्रही चालू करण्यात येऊन कचऱ्यापासून बायोमिथेन गॅस हा प्रकल्प चालू करण्यात येणार आहे. समांतर पाणी पुरवठा योजने अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील अतिरिक्त पाणी टँकरव्दारे शहराला उपलब्ध करून देण्यात येत आहे. लवकरच स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीप्रश्न मिटणार असल्याचा दावाही आयुक्तांनी बैठकीत केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com