Aurangabad District Bank Election News
Aurangabad District Bank Election News

बागडे म्हणतात, पाच वर्ष एकोप्याने, पारदर्शक काम केले, आता पुन्हा संधी द्या

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळासाठी येत्या २१ मार्च रोजी मतदान होत आहे.

औरंगाबाद ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा कारभार गेली पाच वर्ष आम्ही सगळ्यांनी एकोप्याने केला. सगळे व्यवहार पारदर्शकपणे केले. बॅकेला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन माजी विधानसभा अध्यक्ष व बॅंकेचे माजी संचालक आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळासाठी येत्या २१ मार्च रोजी मतदान होत आहे. राज्याच्या सत्तेत दररोज एकमेकांचे वाभाडे काढणारे भाजप आणि शिवसेना या निवडणुकीत एकत्र आले आहेत. सोबत राष्ट्रवादी देखील असल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे. विशेष म्हणजे काॅंग्रेसला या तीन्ही पक्षांनी वेगळे ठेवले आहे.

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी हे तीन पक्ष शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून लढत आहेत, तर काॅंग्रेसने माजी आमदार डाॅ. कल्याण काळे, सुभाष झांबड यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उतरवले आहे. खुल्ताबाद आणि पैठण या दोन मतदारसंघातून अनुक्रमे किरण पाटील डोणगांवकर व रोहयो मंत्री संदीपान भुमरे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

सिल्लोड येथील प्रचार सभेत आमदार हरिभाऊ बागडे यांनी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. गेली पाच वर्ष जिल्हा बॅंकेचा कारभार आम्ही एकोप्याने आणि पारदर्शक पद्धतीने चालवला. शेतकऱ्यांचे हित पाहिले, बॅंक नफ्यात आणली. त्यामुळे सभासद मतदारांनी पुन्हा आमच्यावर विश्वास दाखवावा, असे आवाहन बागडे यांनी केले.

सिल्लोड येथे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. यावेळी रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार नितीन पाटील, अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com