बाबाजानी दुर्राणी कोरोनामुक्त; शायराना अंदाजात मानले आभार

'घडी भर भी मुझे तन्हा कभी होने नही देंतेये मेरे चाहने वाले मुझे सोने नही देतेमेरे सर पर मेरी मॉ की दुवांओं के जो सायें हैसफर में ये कभी हादसा होने नही देते...'
mla babajani durani news pathri
mla babajani durani news pathri


परभणी ः राष्ट्रवादी कॉग्रेसचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, घरी परतल्यानंतर दुर्राणी यांना त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व आईच्या आशिर्वादाने आपण कोरोनावर विजय मिळवू शकलो, अशा भावना व्यक्त केल्या. १८ जुलै रोजी दुर्राणी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून ते औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.

बाबाजानी दुर्राणी यांना १३ जुलैपासून ताप व सर्दीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे ते दुसऱ्या दिवशीपासूनच ते आपल्या निवासस्थानी आराम करत होते. दरम्यान  कुणाच्याही संपर्कात ते आले नव्हते. परंतु १७ रोजी त्यांना त्रास अधिकच जाणवू लागल्याने त्यांना तातडीने औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. १८ जुलैला सकाळी दुर्राणी यांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कोविड वार्डात हलवून उपचार सुरू करण्यात आले होते. १९ दिवस उपचार घेतल्यानंतर काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

रुग्णालयात दाखल असतांना बाबाजानी दुर्राणी यांनी फोनव्दारे कार्यकर्त्याशी संपर्क सुरुच ठेवला होता. या शिवाय दररोज अर्धातास चालण्याचा व्यायाम ही ते करत होते. असत. उपचारानंतर दुर्राणी हे ठणठणीत बरे झाले असून सोमवारी पुन्हा करण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यानंतर स्वःत दुर्राणी व त्यांच्‍या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर त्यांनी आपण कोरोनावर माझ्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्ते व आईच्या आशिर्वादाने मात केल्याचे म्हटले आहे.

एकंदरितच कोरोनाची लागण झाल्यानंतरचा अनुभव १९ दिवस रुग्णालयात घेतलेले उपचार याबद्दल दुर्राणी यांनी आपल्या भावना सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्याच. पण शायराना अंदाजात या आजारपणाच्या काळात त्यांच्या प्रकृतीची काळजी आणि विचारपूस करणाऱ्या समर्थक आणि कार्यकरत्यांचे आभारा देखील त्यांनी मानले. 

'घडी भर भी मुझे तन्हा कभी होने नही देंते
ये मेरे चाहने वाले मुझे सोने नही देते
मेरे सर पर मेरी मॉ की दुवांओं के जो सायें है
सफर में ये कभी हादसा होने नही देते...'

दरम्यान, आमदार बाबाजानी यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार प्रा. फौजिया खान या देखील कोरोनाग्रस्त झालेल्या आहेत. त्या सध्या त्यांच्या परभणी येथील निवासस्थानीच उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी दोन दिवसापूर्वी सोशल मिडियावरील व्हिडिओतून सांगितले होते.

Edited by : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com