डोंगर, दऱ्या, धबधब्यांवर जाऊन सेल्फीचा मोह टाळा; पोलिसांकडून सावधानतेचा इशारा..

निसर्गरम्य ठिकाणावरील सुरक्षा नियंमाचे पालन न केल्याने अनेकवेळा अशा ठिकाणी पाय घसरून पडुन अपघात होतात, काहींना आपले प्राण देखील गमवावे लागतात.
SP Moksada patil news aurangabad
SP Moksada patil news aurangabad

औरंगाबाद :  ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातुन जिल्हयातील नागरिकांनी वैयक्तिक खबरदारी घेण्याचे अनुषंगाने  पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी आवाहन केले आहे. (Avoid the temptation to take selfies by going to mountains, valleys, waterfalls; Warnings from the police)  नदी लगत राहणा-या तसेच धरण क्षेत्राच्या काठावरिल नागरिकांनी वाढता पाऊस आणि पुर परिस्थीती पाहता प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

तसचे वेळीच कुटूंबासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे व आपत्कालिन क्रमांक स्वत:जवळ बाळगावा. (Police Supretendent Aurangabad Gramin Moksada Patil Appeal people) जेणे करून  संकटसमयी तातडीची मदत उपलब्ध होईल.
तसेच पुर परिस्थीतीमध्ये अरूंद पुलावरून, वाहणा-या पाण्यातुन रस्ता ओलांडू नये. तसेच वाहन चालविण्याचे धाडस करू नये, ज्यामुळे पुराच्या पाण्यात वाहुन जाण्याचा धोका संभावतो.

जंगलातुन जाणारे  वळण रस्ते, अरूंद घाट, अशा ठिकाणाहून वाहनासह प्रवास करणे टाळावे. अशा ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडतात. त्यामुळे अशा ठिकाणी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. शक्यतो घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळावे. शेतवस्तीवर राहणाऱ्या कुटूंबानी शेजारी राहणा-या व्यक्तीचे संपर्क क्रमांक स्वत: जवळ ठेवावेत जेणे करून विज पडणे, झाड कोसळणे, नाले -ओढे यांना पुर येणे अशा नैसर्गिक संकटात तातडीची मदत वेळीच पोहचवणे शक्य होईल.

पावसाळ्यात नैसर्गिक सहलीचे दृष्टीकोनातुन पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाणासह, धरणे, धबधबे, पाण्याचे कुंड, इत्यादी ठिकाणी भटकंती करिता मोठया प्रमाणावर जातात. यावेळी  वाहणा-या धबधब्याजवळ, डोंगर, दऱ्या अशा ठिकाणी तरुणाई मोठयप्रमाणावर सेल्फी घेण्यासाठी जातात. निसर्गरम्य ठिकाणावरील सुरक्षा नियंमाचे पालन न केल्याने अनेकवेळा अशा ठिकाणी पाय घसरून पडुन अपघात होतात, काहींना आपले प्राण देखील गमवावे लागतात.

डोंगर, रानमाळावर जाणे टाळा..

हे टाळण्यासाठी नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे अगोदर संबधित जागेची- ठिकाणाची पुरेशी माहिती घेणे अत्यावश्यक आहे. डोंगराळ भागातील रस्त्याची परिपुर्ण माहिती नसल्याने अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. शक्यतो पावसात डोंगर अथवा रानमाळावर जाणे कटाक्षाने टाळावे. त्याचप्रमाणे पावसळयात धबधब्याचे ठिकाणी जाऊ नये कारण धबधब्यात वरून पडणा-या पाण्याचा अंदाज बांधता येत नसल्याने पाण्याची आवक वाढल्यास अशा ठिकाणी पर्यटक अडकून पडतात.  

तसेच धरण क्षेत्राचे बॅकवॉटर, तलाव, कुंड इ. ठिकाणी  पाण्याचा अंदाज नसल्यास पोहण्यासाठी पाण्यात जाऊ नये, अशा सूचना देखील पाटील यांनी केल्या आहेत.  या शिवाय कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊन, घाबरू नये, आप्तकालिन परिस्थीतीमध्ये तात्काळ स्थानिक पोलीसांशी किंवा नियंत्रणकक्ष औरंगाबाद ग्रामीण 0240-2381633, 2392151 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com