औरंगाबादेत रेमडिसिव्हरचा काळाबाजार करणारी टोळी पकडली

या प्रकरणी सात जणांच्या टोळीला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी पकडले आहे. पाच रेमडिसिव्हर इंजेक्शनसह ६ मोबाईल, एक कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Remdesiver Sale on Black Gang Arrest By Aurangabad Police News
Remdesiver Sale on Black Gang Arrest By Aurangabad Police News

औरंगाबाद ः संपुर्ण राज्यात कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनाचा प्रंचड तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या मेडिकल व जिल्हा प्रशासनाकडे रांगा लागल्या आहेत. असे असतांना या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळणारी टोळी औरंगाबादेत पकडण्यात आली आहे. गुन्हे शाखेने पाच रेमडिसिव्हिर इंजेक्शनसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल या टोळीकडून जप्त केला आहे.

इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी पकडल्यामुळे आता यांचे आणखी कुणाशी कनेक्शन आहे हे देखील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत औरंगाबादेत रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करून त्याची १५ ते २० हजार रुपयांना विक्री केली जात  असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालय (घाटी) तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय ( मिनी घाटी) येथील काही कर्मचारीच इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे दोन घटनांमधून समोर आले होते.

त्यानंतर पोलिसांनी आज एका टोळीलाच ताब्यात घेतल्यामुळे याचे धागेदोरे कुठवर पोहचलेले आहेत, याचा उलगडा देखील लवकरच होईल. ही टोळी शहरातील कोव्हिड केअर सेंटरमधून इंजेक्शन चोरून काळ्याबाजारात विकत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सात जणांच्या टोळीला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी पकडले आहे.  या टोळीकडून पाच रेमडिसिव्हर इंजेक्शनसह ६ मोबाईल, एक कार असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

बहुतांश आरोपी बदनापूरचे

गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कान्हु नवगिरे (वय २८, रा.जयभीमनगर, गल्ली नंबर ३, औरंगाबाद), संदीप सुखदेव रगडे (वय ३२), प्रविण शिवनाथ बोर्डे (वय २७) दोघे रा.आंबेडकरनगर, ता.बदनापुर,जि.जालना, नरेंद्र मुरलीधर साबळे (वय ३३,रा.समतानगर,ता.बदनापुर,जि.जालना), साईनाथ अण्णा वाहुळ (वय ३२, रा.रामनगर, औरंगाबाद), रवि रोहिदास डोंगरे (रा.भाग्यनगर, औरंगाबाद), अफरोज खान इकबाल खान (रा.बदनापुर,जि.जालना) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असून चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, मीना मकवाना, सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली  ही कारवाई करण्यात आली.

सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, अजबसिंग जारवाल, अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज, पोलिस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, शिवाजी झिने, भगवान शिलोटे, राजेंद्र साळुंके, रितेश जाधव, आनंद वाहुळ, विशाल पाटील, प्रभाकर राऊत, संदीप सानप, नितीन देशमुख आदींच्या पथकाने सापळा रचून  दिनेश नवगीरे याला अटक केली. त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com