Aurangabad City Unlcok Now news
Aurangabad City Unlcok Now news

औरंगाबाद शहर अनलाॅक, उद्यापासून सर्व निर्बंध शिथिल..

सर्व ठिकाणच्या कर्मचारी व मालक, चालकांना कोरोना निगेटीव्ह (आरटीपीसीआर) चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे.

औरंगाबाद ः राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांच्या पाॅझीटीव्हीटीचा दर हा २.२४ टक्के एवढा असल्याने शहर लेव्हल एक मध्ये येत आहे.  तर व्यापलेल्या आॅक्सीजन बेडचे प्रमाण हे २२.१९ टक्के एवढे नोंदवण्यात आले आहे. (Aurangabad city unlocked, all restrictions relaxed from tomorrow.) त्यामुळे औरंगाबाद शहरात सोमावार (.ता.७) पासून पहिल्या टप्प्याच्या नियमावली नूसार निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत.

उद्या सकाळी ७ वाजेपासून हे निर्बंध शिथील करण्यात येणार  असल्याचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे. (These restrictions will be relaxed from 7 am tomorrow) निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी कोरोनाचे नियम जसे की मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायजरचा वापर आदी नियम काटेकोरपणे पाळावेच लागणार आहेत.

प्रशासनाने कळवल्यानूसार उद्या सोमवार सकाळी सात वाजेपासून अत्यावश्यक वस्तू, सेवांसह सर्व प्रकारचे व्यवसाय व दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली  आहे. माॅल, चित्रपटगृहे, रेस्टाॅरंट, नाट्यगृहे, हाॅटेल्स, खानावळी, मैदाने, खुल्या जागा, उद्याने, सायकल ट्रॅक, माॅर्निंग वाॅक, खाजगी कंपन्या, शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयांमधील उपस्थितीही शंभर टक्के राहील.

या शिवाय स्नहेसंमेलन, सार्वजनिक, सामाजिक, सांस्कृतिक व करमणूकीचे कार्यक्रम देखील घेता येतील. (Gatherings, public, social, cultural and entertainment events can also be held.) विवाह समारंभ, अत्यंविधी यावरील बंधने देखील हटवण्यात आली आहेत. सभा, निवडणुका, सहकारी संस्थामधील आमसभा या देखील आता नियमितपणे घेण्यास परवानगी असेल.

बांधकाम, कृषी, ईकाॅमर्स, वस्तू सेवा या पुर्ण क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर यांना देखील पुर्वी प्रमाणेच आपले व्यवहार सुरू करता येतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कार्गो, आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक, खाजगी कार, टॅक्सी, बस वाहतूक देखील खुली करण्यात आली आहे. या शिवाय औद्योगिक वसाहतींना देखील काही नियमांच्या आधीन पुर्णक्षमतेने सुरू करण्याची मुभा असेल.

कोरोना निगेटिव्ह अहवाल आवश्यक

सर्व प्रकारच्या व्यवसाय, उद्योग, आस्थापनावरील निर्बंध हटवण्यात आले असले तरी, या सर्व ठिकाणच्या कर्मचारी व मालक, चालकांना कोरोना निगेटीव्ह (आरटीपीसीआर) चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय कुणालाही व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग करता येणार नाही, असे देखील या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन केले तर जोपर्यंत कोरोना संकटाचे नियम लागू आहेत, तोपर्यंत संबंधित व्यक्तीस त्याच्या व्यवसाय, आस्थापना उघडण्यास परवानगी देण्यात येणार नाही, शिवाय त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com