प्रत्येक कामात टक्केवारीची वृत्ती; भाजप आता टक्का पार्टी झाली आहे..

टक्केवारीत मिंधे झालेल्यांना भ्रष्ट कामाची तक्रार देण्याची सोय राहीली नाही, असा आरोपही अमरसिंह पंडित यांनी केला.
Ncp Leader Amarsinh Pandit News Beed
Ncp Leader Amarsinh Pandit News Beed

बीड : गेवराई भाजपच्या नेतृत्वाने सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांचाही भ्रमनिरास केला. विकास कामांसाठी आलेल्या शासन निधीतील प्रत्येक कामात टक्का खाण्याच्या वृत्तीमुळे गेवराई भाजप टक्का पार्टी झाल्याची घणाघाती टिका राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केला. (Attitude of percentage in each work; BJP has now become a party. Said Ncp Leader Amarsinh Pandit, Beed)

टक्केवारीत मिंधे झालेल्यांना भ्रष्ट कामाची तक्रार देण्याची सोय राहिली नाही, अशा निष्क्रीय नेतृत्वाला कंटाळून शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. (Georai Bjp Beed) प्रत्येकाला सन्मान देवून येणाऱ्या कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास विश्‍वासही पंडित यांनी व्यक्त केला. 

गेवराई तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी अमरसिंह पंडित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन राष्ट्रवादीत प्रवेश केला.  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाबुराव जाधव, सभापती जगन काळे, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, युवराज जाधव, दिपक आतकरे, राधेशाम येवले, कुमार ढाकणे आदींची यावेळी उपस्थिती होती.  

भाजप नेतृत्वावर हल्लाबोल करतांना पंडीत म्हणाले, गेवराई तालुक्यातील अनेक तरुण मोठ्या उमेदीने भाजपा - सेनेत गेले, पण त्यांनी त्यांना नाऊमेद केले. पंचायत समिती आणि नगर परिषदेमध्ये टक्केवारी दिल्याशिवाय कामे होत नाहीत, निराधारांच्या वेतनापासून ते घरकुलापर्यंत गोरगरीबांकडून सुध्दा हे लोक टक्केवारी घेत आहेत.

पंडितांच्या नावाने खडे फोडून सत्ता मिळविणाऱ्यांना आता लोक विकास कामांबाबत जाब विचारू लागले आहेत. जाणीवपूर्वक गलिच्छ राजकारण करून लोकांची कामे अडविण्याचे उद्योग करणाऱ्यांना आता आडवे करण्याची वेळ आली आहे.  

यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश..

सरपंच युवराज जाधव यांच्यासह राजेंद्र जाधव, कृष्णा जाधव, रंगनाथ जाधव, मुकेश जाधव, संतोष जाधव, बाबुराव जाधव, शाम जाधव, विजय जाधव, बाळु जाधव, लहु जाधव, संजय जाधव, लक्ष्मण जाधव, बाबासाहेब वाळेकर, दिलीप मैंद, गणपत पवार, आश्रृबा मैंद, तात्माबा वाळेकर, शंकर वाळेकर, भिमराव सोळुंके, विठ्ठल पवार, शिवाजी मैंद, राजेंद्र राठोड, कृष्णा चव्हाण, अशोक राठोड, अनिल राठोड, मच्छिंद्र राठोड, रामेश्वर राठोड आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com