बीडमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर हल्ला, तलावात फेकण्याचा प्रयत्न..

हनुमान जगताप हे बीड-परळी रोडवरून जात असतांना घोडका राजुरी पुलाजवळ त्यांना मोटारसायकलवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी रोखले.
beed Shivsena news
beed Shivsena news

बीड ः शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला करत त्याला तलावात टाकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ( Attack on Shiv Sena Deputy District Chief in Beed, attempt to throw him in a lake )बीड-परळी रोडवरील राजुरीच्या पुलावर ही घटना घडली.

हल्ला होत असतांना काहीजण मदतीला धावल्यामुळे हल्लेखोरांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला तिथेच सोडून पळ काढला. (Shivsena Beed) या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

काही महिन्यांपुर्वी बीड जिल्हा शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले होते.(Hanuman Jagtap, Beed Shivsena District Deputy Chief) नवनिर्वाचित जिल्हाप्रमुखाला त्याच्या मिरवणूकीतच विरोध केल्यामुळे माजलगांव येथील शिवसेना उपशहरप्रमुखाला पट्ट्याखाली मारहाण करण्यात आली होती.

परंतु ही मारहाण संघटनेतील अंतर्गत वादातून करण्यात आली होती. आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप  यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्यामागे नेमके काय कारण आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हनुमान जगताप हे बीड-परळी रोडवरून जात असतांना घोडका राजुरी पुलाजवळ त्यांना मोटारसायकलवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी रोखले. काही विचारायच्या आतच या हल्लेखोरांनी तलावर, लाठ्या-काठ्यांनी जगताप यांना मारहाण सुरू केली.

मारहाण करत हल्लेखोर शेजारी असलेल्या तलावाच्या दिशेने त्यांना घेऊन जात होते. पण मदतीसाठी जगताप यांनी आरडाओरड केल्यामुळे काहीजण त्यांच्याकडे धावले. तेव्हा हल्लेखोरांनी जगताप यांनी त्यांना तिथेच सोडून पळ काढला.

हल्लेखोर जगताप यांना मारहाण करून तलावात फेकून देण्याच्या तयारी असल्याचे बोलले जाते. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत हनुमान जगताप यांना  बीड जिल्हा रुग्णालयात उपचार साठी दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या हल्ला प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेमुळे शिवसेनेत मात्र संतापाचे वातावरण असल्याचे समजते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com