एटीएम चोरांचा पाठलाग,पोलिसांकडून हवेत गोळीबार; तरीही आरोपी पळाले.. - ATM thieves chased, police firing in the air; The accused still escaped. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

एटीएम चोरांचा पाठलाग,पोलिसांकडून हवेत गोळीबार; तरीही आरोपी पळाले..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 जून 2021

आरोपींनी गोळीबाराला न जुमानता गाडी सोडून पळ काढला. एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग आणि थरार नागरिकांना अनुभवायला मिळाला.

जालना ः एटीएम चोरीतील आरोपी औरंगाबादहून जालन्याच्या दिशेने निघाल्याची माहिती परभणी गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार पोलिसांच्या पथकाने औरंगाबादहू या एटीएम चोरांचा पाठलाग सुरू केला. (ATM thieves chased, police firing in the air; The accused still escaped.) अलिशान कारमध्ये आरोपी पुढे आणि पोलिस त्यांच्या मागे असा थरार ६० ते ७० किलोमीटर सुरू होता.

जालन्याहून भोकरदनपर्यंत आरोपींचा पाठलाग करत पोलिस गेले. पोलिस पिच्छा सोडत नसल्याने संतपालेल्या आरोपींनी भोकरदन-जाफ्राबाद रोडवर आपली अलिशान कार रस्त्याच्या कडेला उभी करत पोलिसांवर हल्याचा प्रयत्न केला. (Parbhani Police) आरोपी आक्रमक झाल्याचे पाहून परभणी पोलिसांनी हवेत गोळीबार करत त्यांना शरण येण्याचे आवाहन केले.

पण आरोपींनी गोळीबाराला न जुमानता गाडी सोडून पळ काढला. एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग आणि थरार नागरिकांना अनुभवायला मिळाला. (Jalna-Bhokardan) एटीएम चोरीच्या प्रकरणातील आरोपींच्या शोधात परभणी पोलिसांचे पथक औरंगाबादेत आले होते. तिथून सुरू झालेला पाठलाग जालना जिल्ह्याच्या भोकरद तालुक्यातील आलापूर गावाजवळ थांबला.

मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ आणि उलटसूलट चर्चांना उधाण आले आहे. भोकरदन शहरातील जाफ्राबाद  रोडवरील  केळणा नदी पत्रावर या चोरांनी पोलिसांवर शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.  

यावेळी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला.  या आवाजाने परिसरात एकाच खबळ उडाली. भोकरदन शहरापासून बऱ्याच अंतरापर्यंत पोलिसानी या चोरट्याचा पाठलाग केला मात्र, गाडी सोडून पळ काढला. आरोपी भोकरदन शरातील आलापूर परिसरात लपल्याचा अंदाज असून ,या परिसरात स्थानिक पोलिसाच्या मदतीने शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा ः राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी भरत घनदाट, जयत पाटलांनी दिले नियुक्ती पत्र..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख