तब्येतीची विचारपूस केली अन् अमरसिंहांनी जिल्ह्याच दुखणंही पवारांच्या कानी घातलं..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर १२ दिवसांत तीन शस्त्रक्रीया झाल्या. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व सतीश चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.
Ncp Leader Amarsinh Pandit Meet Shard Pawar In Mumbai News
Ncp Leader Amarsinh Pandit Meet Shard Pawar In Mumbai News

बीड : जिल्ह्यातील रेमडेसिव्हीर,ऑक्सीजन, फॅबीफ्ल्यू, टेस्टींग किट तुटवड्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना बोलून पुरवठा सुरळीत करण्यात येईल, (Asked about health, Amar Singh also told Pawar about the problam of the district.) असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांना दिले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावर नुकतेच १२ दिवसांत तीन शस्त्रक्रीया झाल्या. त्यानंतर पवार सहसा कोणाला भेटत नाहीत. आग्रहानंतर त्यांनी पंडित व चव्हाण यांना वेळ दिला. (Gave time to Pandit and Chavan then met Sharad Pawar at his Silver Oak residence in Mumbai) त्यानंतर या दोघांनी मंगळवारी मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली.

तब्बेतीची विचापूस केल्यानंतर पवारांनी पंडित यांनी गढी (ता. गेवराई) येथे सुरु केलेल्या मोफत कोविड केअर सेंटर व गेवराईतील पहिल्या महिला कोविड केअर सेंटरचा विषय काढून समाधान व्यक्त केले.

त्यानंतर पंडित यांनी जिल्ह्यातील कोरोना उपचार आणि तपासणीसाठी येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. त्यावर पवारांनी राजेश टोपे यांना बोलून आवश्यक सामुग्री उपलब्ध करुन देण्याचे सांगू असे सांगीतले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com