सामाजिक मागसलेपण सिध्द करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण, राज्य सरकारची..

मराठा आरक्षणावर जेव्हा संसदेत बोलायची वेळ आली तेव्हा कुणालाच बोलू दिले जात नव्हते. मी जेव्हा सभागृहाला विनंती केली तेव्हा मला बोलण्याची संधी दिली.
सामाजिक मागसलेपण सिध्द करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण, राज्य सरकारची..
Chhatrapati Sambhajiraje-Ashok Chavan- Reservation News Nanded

नांदेड ः सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज हा पुढारलेला आहे, असे सांगत आरक्षण रद्द केले आहे. मग आता काय करायचे, पन्नास टक्के मर्यादा वाढवण्याची मागणी राज्य केंद्राकडे करते आहे. मी देखील केली आहे, पण त्याने काही होणार नाही. त्यासाठी आधी मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागसलेपण सिद्ध होणे गरजेचे आहे. (Ashok Chavan, State Government is responsible for proving social backwardness.) ही जबाबदारी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तुमचे नांदेडकर यांची आहे, आज ते कुठे दिसत नाही. त्यांनी यासाठी पुढाकाल घ्यायला पाहिजे, राज्य सरकारने जबाबदारी घ्यावी, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

नांदेड येथे मराठा क्रांती मुक मोर्चाच्या निमित्ताने संभाजीराजे आज नांदेडमध्ये होते. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक या मूक मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलकांना मार्गदर्शन करतांना संभाजीराजे छत्रपती यांनी अशोक चव्हाण यांच्यासह राज्य सरकारवर टीका केली. (Bjp Mp Chhatrapati Sambhajiraje) संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकार केंद्राकडे टोलवत होते, तर केंद्र राज्याकडे. पण आता केंद्राने घटनादुरुस्ती करत राज्यांना अधिकार देऊन टाकले आणि सांगितले द्या, मराठा समाजाला आरक्षण.

पण राज्याला अधिकार देऊन चालणार नाही, याने समाजाला आरक्षण मिळणार नाही. ते द्यायचे असेल तर मराठा समाजाला सामाजिक मागसलेपण सिद्ध करावे लागेल. (Maratha Reservation Maharashtra) राज्यांना अधिकार मिळाल्यानंतर आता पन्नास टक्यांची मर्यांदा वाढवून द्या, अशी मागणी राज्याकडून केंद्राकडे केली जात आहे. मी देखील ही मागणी केली आहे. पण ही मर्यादा वाढवण्यासाठी देखील आधी मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करावे लागेल.

गायकवाड समितीने आम्हाला मागस ठरवले होते. पण भोसले समितीने सुचवलेल्या त्रुटी आता दूर कराव्या लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज पुढारलेला आहे असे सांगून आरक्षण रद्द केले आहे. मग मराठा समाजाला नव्याने सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे लागणार आहे, पण यावर राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तुमचे नांदेडकर यांनी याची जबादारी घ्यायला पाहिजे, पण ते सध्या इथं दिसतं नाहीत. राज्य सरकारने देखील यावर ठोस काही करणे गरजेचे आहे.

त्यामुळे नुसते जयजयकार, माझे फोटो काढून काहीही होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने आतापर्यंत काय केले हे सांगितले पाहिजे. या शिवाय लोकप्रतिनिधींनी देखील गेल्या दोन वर्षापासून आपण समाजासाठी काय केले? हे सांगायला पाहिजे, असे आवाहन देखील संभाजीराजे यांनी केले.

तर खासदारकीला लाथ मारली असती..

मराठा आरक्षणावर जेव्हा संसदेत बोलायची वेळ आली तेव्हा कुणालाच बोलू दिले जात नव्हते. मी जेव्हा सभागृहाला विनंती केली तेव्हा मला बोलण्याची संधी दिली. अनेक लोकप्रतिनिधींनी तेव्हा मदत केली. दहा-पंधरा मिनिटे मी सभागृहात आरक्षणावर भूमिका मांडली. पण जर मला बोलू दिले नसते तर खासदारकीवर लाथ मारली असती, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. जर सभागृहात बोलू दिले नसते तर आमचा उपयोग काय? असा प्रश्नही त्यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in