अशोक चव्हाण म्हणतात, जगातल्या चांगल्या गोष्टी माझ्या मतदारसंघात आल्या पाहिजेत..

भोकर आणि नांदेड जिल्ह्यातील न्यायालयाच्या इमारती व सुविधांसाठी ज्यांनी निधी उपलब्ध करून दिला ज्यांच्याकडे राज्याचा न्याय व विधी विभाग आहे, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील मी आभार मानतो.
Minister Ashok Chavan Bhokar-Nanded News
Minister Ashok Chavan Bhokar-Nanded News

नांदेड ःअनेकदा आपण चित्रपटात चकचकीत कोर्ट, तेथील सुविधा पाहतो. तशाच प्रकारच्या जगातील सगळ्या चांगल्या गोष्टी, सुविधा माझ्या भोकर मतदारसंघात व नांदेड जिल्ह्यात असल्या पाहिजेत, अशी इच्छा राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. पालकमंत्री म्हणून मी जिल्ह्यासाठी अधिकच काही केलं तर माझ्यावर कुणी बोट ठेवणार नाही, असेही ते म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायाल्याच्या विस्तारित इमारतीच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले. यावेळी विधीमंडळात आम्ही कायदे करण्याचे काम करतो आणि त्याची अंमलबजावणी योग्यरित्या करत सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका न्यायाधीश बजावत असतात. न्यायदानाचे काम गतीमान व्हावे, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारची न्यायालये एकाच इमारतीत किंवा परिसरात असावीत अशी अपेक्षा आहे. जेणेकरून प्रॅक्टीस करणाऱ्या वकीलांसह सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळेल आणि न्याय प्रक्रियेचे काम वेगाने होईल, अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. विदेशात आणि चित्रपटात जेव्हा न्यायालयात मिळणाऱ्या सुविधा तेथील व्यवस्था पाहिली की जगांत जे काही चांगल आहे, ते आपल्या मतदारसंघात, जिल्ह्यात असलं पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. त्यात काही वावग नाही.

भोकर आणि नांदेड जिल्ह्यातील न्यायालयाच्या इमारती व सुविधांसाठी ज्यांनी निधी उपलब्ध करून दिला ज्यांच्याकडे राज्याचा न्याय व विधी विभाग आहे, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील मी आभार मानतो. त्यांनी तात्काळ या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. ज्यामुळे ही कामे वेगाने होत आहेत, असेही चव्हाण म्हणाले.

सुप्रीम कोर्ट ते जिल्हा न्यायालय स्तरावर अनेक प्रश्न आणि समस्या आहेत. त्या वेळोवेळी सोडवल्या देखील जातील. या निमित्ताने तालुका आणि जिल्हा न्यायालयांचे संलग्नीकरण व इतर मागण्या पुढे आल्या आहेत. त्यावर वरिष्ठ न्यायाधीशांशी चर्चा करून योग्य मार्ग निश्चितच काढू, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगतिले.

तर पाच हजार लोक आले असते..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या इमारत विस्तारीकरणाचा कार्यक्रम आपण छोटेखानी घेत आहोत. कोरोनाचे नियम न्यायालयाच्या कार्यक्रमात तर पाळले गेलेच पाहिजे. कोरोनाचे संकट नसते तर या भुमीपूजन कार्यक्रमाला भोकरचे पाच हजार लोक आलेे असते. पण उद्घाटनाचा कार्यक्रम आपण निश्चितच मोठा करू, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com