अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी मुंबईला रवाना...

आज सकाळी दहा वाजता सदर रुग्णालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अकरा वाजता अशोक चव्हाण रुग्णालयातून चालत आले आणि बाहेर उभ्या असलेल्या कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये बसले.थोड्याच वेळात हा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला.
aschok chavan news nanded
aschok chavan news nanded

नांदेडः कॉंग्रेसचे नेते राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. नांदडे येथे त्यांच्या स्वॅबच्या तपासणी अहवालानंतर चव्हाण यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. दुपारी नांदेडहून ॲम्बुलन्सने ते मुंबईकडे रवाना झाले. 

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना यापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपाचारानंतर आव्हाड बरे होऊन काही दिवसांपुर्वीच घरी परतले आहेत. त्यानंतर राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे सोमवारी (ता. २५) मुंबईला उपचारासाठी कार्डियाक अम्ब्युलन्समधून रवाना झाले. मुंबईहून नांदेडला दोन दिवसापूर्वी आल्यानंतर रविवारी (ता. २४) त्यांना कोरोनाचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ आरोग्य यंत्रणेला सांगून स्वॅब तपासणीसाठी दिला. रविवारी रात्री नऊ वाजता शिवाजीनगर येथील ६१ वर्षीय शिवाजीनगर आणि चाळीस वर्षीय विवेकनगर येथील एका अशा दोन व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

कोरोनाची लक्षण आढळल्यामुळे चव्हाण यांनी तपासणी करुन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रात्रीच ते एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले होते. ही माहिती कळताच कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी देखील रुग्णालयाकडे धाव घेतली. आमदार अमर राजूरकर चव्हाण यांच्या सोबतच होते. आज सकाळी दहा वाजता सदर रुग्णालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अकरा वाजता अशोक चव्हाण रुग्णालयातून चालत आले आणि बाहेर उभ्या असलेल्या कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये बसले आणि हा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

नांदेडचे पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायम जिल्हा प्रशासना सोबत बैठका घेत होते. शिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरून लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या अनेक गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा व दैनंदिन गरजेच्या वस्तुंचे किट वाटण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधान परिषद निवडणूकीसाठी ते तातडीने विमानाने मुंबईला गेले होते. या शिवाय राज्य मंत्रीमंडळाच्या महत्वाच्या बैठकांना देखील ते हजर रहायचे. नव्या विधान परिषद सदस्यांचा शपथ विधी झाल्यानंतर ते तीन दिवसांपुर्वीच नांदेडला आले होते.

साहेब...आपण लवकर बरे व्हा...

दरम्यान, अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना या आजारातून बरे होण्यासाठी शेकडो सदिच्छा संदेश सोशल मिडियावर व्हायरल झाले. कोरोनाविरूद्ध जीव धोक्यात घालून मैदानात उतरलेला योद्धा कोरोनाला हरवून परत येईल. या कठीण काळात आपण नांदेडची काळजी कुटुंब प्रमुख म्हणून घेत होता. जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. माझा देव हार माननारा नाही. तमाम गोरगरिब, शेतकरी, कष्टकऱ्यांचे आशीर्वाद व आशीर्वादाची मोठी पुण्याई साहेबांच्या पाठीशी आहे. साहेब लवकरच बरे होऊन येतील, अशा पोस्ट आणि सदिच्छांचा त्यात समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com