अशोक चव्हाण यांनाही काॅमन मॅनची भुरळ, नांदेडात उभारले शिल्प

सामान्य माणसाच्या नजरेतून एखाद्या घटनेकडे कसे पाहायला पाहिजे, याचे प्रतिक म्हणजे आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटलेला कॉमन मॅन आहे.
अशोक चव्हाण यांनाही काॅमन मॅनची भुरळ, नांदेडात उभारले शिल्प
ashok chavan Selfie With Common Man Statue news Nanded

नांदेड ः भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार पद्मविभुषण आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून साकारलेल्या कॉमन मॅनचा पुतळा आता माता गुजरीजी विसावा उद्यानात उभारण्यात आल्याने सामान्य माणसांच्या प्रती महापालिकेचे उत्तरदायित्व अधिक वाढले आहे. (Ashok Chavan is also fascinated by the Common Man, a sculpture erected in Nanded; Also took a selfie) परस्पर विश्वासाचा आणि विकासप्रती कटिबद्धतेचे हे आदर्श मापदंड ठरल्याचे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.

नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानात आर. के. लक्ष्मण यांनी साकारलेल्या कॉमन मॅनच्या शिल्पाचे अनावरण पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. (Pwd Minister Ashok Chavan Maharashtra)  यावेळी चव्हाण यांनी कॉमनमॅन सोबत सेल्फीही काढला. नांदेडमध्ये कॉमन मॅनच्या पुतळ्याची भर टाकू असा शब्द दिला होता.

आर. के. लक्ष्मण यांना व त्यांच्या परिवाराला मी भेटलो आहे. सामान्य माणसाच्या नजरेतून एखाद्या घटनेकडे कसे पाहायला पाहिजे, याचे प्रतिक म्हणजे आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटलेला कॉमन मॅन आहे.  या कॅमनमॅनच्या शिल्पाचे उद्‍घाटन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात होणे, हे एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांना वंदन करण्यासारखे असल्याचे चव्हाण म्हणाले.

यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांची दररोज सकाळी होणारी तारांबळ थांबविण्याच्या उद्देशाने त्यांना एक स्वतंत्र ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करणाऱ्या जागेची उपलब्धी करुन देण्यात आली आहे.  त्यांचा अनौपचारिक शुभारंभही पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील व्यंगचित्रकारांचा आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.

व्यंगचित्रकारांतर्फे बाबुराव गंजेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आर. के. लक्ष्मण यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in